ट्विटरवर धूलचा धुरळा! संजू, इशान नाही तर यश धूलला संधी? | Yash Dhull IND vs SL Team India Squad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yash Dhull IND vs SL Team India Squad

IND vs SL Yash Dhull : ट्विटरवर धूलचा धुरळा! संजू, इशान नाही तर यश धूलला संधी?

Yash Dhull IND vs SL Team India Squad : श्रीलंकेविरूद्धच्या तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. मात्र संघाची घोषणा होण्यापूर्वीच ट्विटरवर एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. सहसा भारतीय संघ निवडीच्यावेळी संजू सॅमसन सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत असतो. मात्र आज दिल्लीच्या यश धूलने ट्विटरवर ट्रेंड होण्यात त्यालाही मागे टाकले.

यश धूल हा ज्या 19 वर्षाखालील भारतीय संघाने 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडला मात देत वर्ल्डकप जिंकला होता त्या संघाचा कर्णधार होता. आता त्याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता ट्विटरवर वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Ranji Trophy : W,W,W,W,W,W,W,W... 8 षटकात 8 विकेट्स घेणाऱ्या दीपकसाठी जय शहांनी केले ट्विट; टीम इंडियाचं दार उघडणार?

यश धूलने 10 प्रथम श्रेणी सामन्यात 939 धावा ठोकल्या आहेत. त्यात 4 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याने 67 च्या सरासरीने धावा केल्या आहे. लिस्ट A (देशांतर्गत वनडे सामना) मध्ये त्याने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत त्यात त्याने 191 धावा केल्या असून एक अर्धशतक ठोकले.

यश धूलची देशांतर्गत स्पर्धांमध्ये कामगिरी चांगली झाली आहे. मात्र भारतीय क्रिकेट वर्तुळात इतके गुणवान खेळाडू रांगेत उभे आहेत की 20 वर्षाच्या यश धूलला इतक्यात भारताच्या वरिष्ठ संघात संधी मिळेल असे वाटते नाही.

हेही वाचा: Virat Kohli : ठरलं तर मग! विराट कोहली टी 20 मधूनच घेणार ब्रेक; आता IPL 2023...

मात्र तरी देखील यश धूल ट्विटरवर ट्रेंड होतोय. अनेक चाहते निवडसमिती यश धूलला संधी देण्याची शक्यता असल्याचे ट्विट करत आहेत. धूलला श्रीलंकेविरूद्धच्या आगामी वनडे आणि टी 20 मालिकेसाठी संधी मिळेल अशी आशा नेटकरी व्यक्त करत आहेत. यात क्रिकबझचा देखील हवाला देण्यात येत आहे. (Cricket Latest News)

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'