esakal | भारताच्या T20 वर्ल्ड कप संघात बदल करावा का? माजी खेळाडू म्हणतो... | Team India
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India

संघातून काही अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आलंय

भारताच्या वर्ल्ड कप संघात बदल करावा का? माजी खेळाडू म्हणतो..

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: सध्या भारतीय खेळाडू आणि इतर परदेशी खेळाडू IPLमध्ये खेळत आहेत. IPL संपल्यानंतर युएई आणि ओमानच्या धर्तीवर T20 World Cup 2021चा थरार रंगणार आहे. टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड महिन्याभरापूर्वीच करण्यात आली आहे. या संघात काही अनुभवी तर काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघातून शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांना वगळण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर या खेळाडूंना राखीव गटात ठेवण्यात आले आहे. हे चारही खेळाडू IPLमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे टी२० विश्वचषकाच्या संघात बदल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. संघात बदल करणं शक्य आहे की नाही याबाबतचा प्रश्न अद्याप विचारात आलेला नाही. मात्र, बड्या स्पर्धेसाठी निवडलेला संघ बदलावा का? यावर मुंबईकर माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याने आपलं मत व्यक्त केलं.

Shreyas Iyer

Shreyas Iyer

ज्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यापैकी काही खेळाडू IPLमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. पण असं असलं तरी अशा प्रकारच्या संघात दुखापती वगळता बदल करू नयेत असं मत अजित आगरकरने व्यक्त केलं. "वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांसाठी एकदा तुम्ही संघाची निवड केलीत, तर त्या संघात दुखापती वगळता बदल केले जाऊ नयेत असं मला वाटतं. मला मान्य आहे की संघात असलेल्या काही खेळाडूंचा फॉर्म सध्या चांगला नाही. पण कोणत्याही फलंदाजाला किंवा गोलंदाजाला फॉर्ममध्ये परतण्यासाठी केवळ एका चांगल्या डावाची गरज असते आणि IPLच्या आधी तो फॉर्म नक्कीच परत येऊ शकतो.

फॉर्ममध्ये परतला इशान किशन, पाहा Video:

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर

loading image
go to top