esakal | श्रीलंका दौऱ्यावरील भारताचे आणखी दोन खेळाडू कोविड पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

श्रीलंका दौऱ्यावरील भारताचे आणखी दोन खेळाडू कोविड पॉझिटिव्ह

sakal_logo
By
विराज भागवत

दोन दिवसांपूर्वीच कृणाल पांड्याला झालीय कोरोनाची लागण

कोलंबो: भारतीय संघाचा श्रीलंका दौरा विविध कारणांमुळे लक्षात राहण्यासारखा झाला. तीन दिवसांपूर्वी डावखुरा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या कोविड पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे इतर खेळाडूंनाही क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर भारतीय संघ उपलब्ध खेळाडूंसोबत उर्वरित टी२० सामने खेळला पण त्यात भारताला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता श्रीलंका दौऱ्यावरील भारताचे आणखी दोन खेळाडू कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. भारताचा युझवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम हे दोघेही कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगितलं जात आहे. (Team India two more cricketers Yuzvendra Chahal and K Gowtham test positive for Covid 19 after Krunal Pandya)

हेही वाचा: श्रीलंका दौऱ्यावरील भारताचे आणखी दोन खेळाडू कोविड पॉझिटिव्ह

कृणाल पांड्या तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौतम हे दोघेही कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे. टीम इंडियातील दोन खेळाडू पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन खेळाडू युजवेंद्र चहल आणि गौतमच आहेत असं सूत्राने सांगितल्याचे वृत्त ANI ने दिलं आहे. हे दोघे हॉटेल रूममध्ये कृणाल पांड्याच्या जवळच्याच रूममध्ये राहत होते. पण दिलासादायक बाब म्हणजे इतर संघापासून हे खेळाडू दूर होते, असेही सांगण्यात आले आहे.

loading image
go to top