Umesh Yadav: मित्रच निघाला शत्रू! लावला लाखो रुपयांचा चुना, उमेश आता मारतोय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umesh Yadav

Umesh Yadav: मित्रच निघाला शत्रू! लावला लाखो रुपयांचा चुना, उमेश आता मारतोय...

Umesh Yadav : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव विश्वासघात आणि फसवणुकीला बळी पडला आहे. उमेशने त्याचा मित्र शैलेश ठाकरे यांच्यावर 44 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे. उमेशच्या तक्रारीवरून कोराडी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी अमितेश कुमार यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवला आहे. अशी माहिती मिळाली आहे की ठाकरे यांनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी क्रिकेटपटूच्या पैशाचा वापर केला.

हेही वाचा: IND vs NZ: न्युझीलंडला नाव ठेवले, फॅन्सनं इरफानच्या घशात दात घातले

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. एफआयआरनुसार, क्रिकेट खेळताना उमेश यादव आणि ठाकरे यांच्यात मैत्री झाली होती. यादवची भारतीय संघात निवड झाल्यानंतर ठाकरे यांनी 2011 ते 2013 या कालावधीत कोणत्याही कमिशनशिवाय त्याला आर्थिक, आयकर, बँकिंग आणि इतर संपर्क बाबींमध्ये मदत केली. 2013 मध्ये यादव यांनी ठाकरे यांना दरमहा 50 हजार रुपये देण्यास सुरुवात केली. ही रक्कम परस्पर सहमतीपेक्षा 15,000 रुपये जास्त होती.

हेही वाचा: Team India ODI Rankings: हरलं न्यूझीलंड फायदा झाला इंग्लंडचा; भारताची काय आहे स्थिती

उमेश यादवने त्याचा मित्र शैलेश ठाकरे यांच्यावर इतका विश्वास ठेवला की त्याने त्याला पॉवर ऑफ अॅटर्नी (POA) दिली होती ज्याद्वारे तो BCCI, IPL फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स लिमिटेड आणि ब्रँड प्रमोशनचे व्यवस्थापन करू शकतो. यादवने त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी शैलेश ठाकरे आपल्या अपेक्षेप्रमाणे वागला नाही. त्यांनी कोणत्याही अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत.

हेही वाचा: IND vs NZ: न्युझीलंडला नाव ठेवले, फॅन्सनं इरफानच्या घशात दात घातले

या वेगवान गोलंदाजाने ठाकरे यांच्यामार्फत नागपूर आणि परिसरात काही मालमत्ता खरेदी केल्या होत्या. 2014 मध्ये उमेश यादव यांनी शहरातील गांधीसागर तलावाजवळ दुकाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ठाकरे यांच्या नावे पीओए काढला होता. 2014 ते 2015 दरम्यान, यादवने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोराडी येथील एमएसईबी कॉलनी शाखेतील त्यांच्या खात्यातून 44 लाख रुपये ट्रान्सफर केले. नंतर यादव यांना कळते की ठाकरे यांनी ही मालमत्ता स्वतःच्या नावावर खरेदी केली होती. उमेश यादव आता पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारतोय.