esakal | T20 World Cup पाक विरुद्ध नव्या लूकमध्ये दिसणार टीम इंडिया | Team India New Jersey
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

T20 World Cup पाक विरुद्ध नव्या लूकमध्ये दिसणार टीम इंडिया

sakal_logo
By
सुशांत जाधव

स्पर्धेत विराट ब्रिगेड नव्या लूकमध्ये (Team India New Jersey) दिसणार आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. नव्या जर्सीचा रंग कोणता असणार? कोणत्या नवी शेडसह ही जर्सी तयार करण्यात येणार? यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं अनावरण 13 आक्टोबरला करण्यात येणार असल्याचा उल्लेख बीसीसीआयने या पोस्टमध्ये केला आहे.

बीसीसीआयने पोस्टमध्ये लिहिलंय की, उत्सुकता लागून असलेल्या क्षणाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. 13 आक्टोबरला होणाऱ्या मोठ्या घोषणेसाठी तयार रहा. भारतीय संघाच्या जर्सीचा लूक जरी नवा असला तरी पारंपारिक निळ्या रंग कायम असेल, अशी चाहत्यांना अपेक्षा असेल. निळी जर्सी टीम इंडियाची ओळख बनली असून या जर्सीमुळे टीम इंडियाला 'मेन इन ब्लू' संबोधले जाते.

टीम इंडिया नव्या लूकमध्ये दिसणार

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून एका नव्या जर्सीत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. सध्याच्या घडीला भारतीय संघ 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये घातलेल्या गडद निळ्या जर्सीशी मिळती जुळती गडद रंगाची जर्सी घालताना दिसते. गडद निळ्या रंगाची जर्सी केवळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असेल, असे बोलले गेले. मात्र इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातील भारतीय संघ याच जर्सीत दिसला होता. त्यामुळे आता नवा लूकमध्ये आणखी काय बदल पाहायला मिळणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल.

भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करणार स्पर्धेला सुरुवात

यूएई आणि ओमानच्या मैदानात रंगणारी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. 24 आक्टोबरला हा हायहोल्टेज सामना खेळवण्यात येईल. सुपर-12 चा पहिला सामना 23 आक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामन्याने सुरु होतील. स्पर्धेत थेट पात्र ठरलेले 8 संघ 18 आणि 20 आक्टोबरला प्रत्येकी दोन सराव सामने खेळणार आहेत. प्रत्येक दिवशी चार सामने खेळवण्यात येणार आहेत.

loading image
go to top