INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय 

टीम ई-सकाळ
Saturday, 25 January 2020

वीस ओव्हर्समध्ये 204 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला दहाच्या सरासरीनं खेळावं लागणार होतं.

ऑकलँड (न्यूझीलंड) : न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या टी-20 सामन्यात 204 रन्सचं आव्हानात्मक लक्ष्य टीम इंडियानं सहज पार केलयं. बोलर्सकडून थोडी निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या बॅट्समननी सांघिक कामगिरी करत, विजय खेचून आणला. भारताकडून केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रेयसनं विजय खेचून आणला 
वीस ओव्हर्समध्ये 204 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला दहाच्या सरासरीनं खेळावं लागणार होतं. त्यातच रोहित शर्मा सारखा हुकमी एक्का केवळ सहा बॉल्समध्ये सात रन्स करून माघारी परतला. त्यानं एक सिक्सर मारून मैदानावरील भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, रोहितनं निराशा केली. विराट मैदानात उतरल्यानंतर मात्र मॅचचं चित्र बदललं. विराटनं 32 बॉल्समध्ये 45 रन्स केल्या त्यात त्यानं तीन सिक्सर मारल्या होत्या. विराटपेक्षा राहुल जास्त आक्रमक होता. त्यानं 27 बॉल्समध्ये 56 रन्स करून विजयाची जणू पायाभरणीच केली. राहुल आणि विराट माघारी आल्यानंतर श्रेयस अय्यरनं 29 बॉल्समध्ये नॉट आऊट 58 रन्स करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्यानं 3 सिक्सर खेचून विजयात मोलाचा वाटा उचलला. शेवटी टीमला विजयासाठी 7 बॉल्समध्ये 6 रन्स हव्या असताना श्रेयसनं सिक्सर मारूनच विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराट आणि राहुल हे अनुभवी बॅटस् मन आऊट झाल्यानंतर भारतीय गोटात चिंता वाढली होती. पण, श्रेयसनं पुन्हा एकदा विश्वास सार्थ ठरवत, मधल्या फळीत आपण सर्वोत्तम पर्याय असल्याचं दाखवून दिलं. 

स्पोर्ट्सच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शार्दुल ठरला महागडा
तत्पूर्वी, न्यूझीलंडच्या बॅट्समनी भारतीय बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. न्यूझीलंडनं वीस ओव्हर्समध्ये 203 रन्स करत भारतापुढं मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यांच्या मुन्रो आणि विल्यमम्सननं अर्थशतकं झळकावली. मुन्रोनं 59, तर विल्यमसननं 51 रन्स केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूर सर्वांत महागडा बॉलर ठरला. त्यानं तीन ओव्हरमध्ये 44 रन्स दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: team india won by 6 wickets against new zealand first t20 match 2020