

Tokyo World Athletics 2025
esakal
टोकियो : जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसेचे ११० मीटर हर्डल्स शर्यतीत उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न थोडक्यात भंग झाले. त्याचप्रमाणे महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरी आणि पुरुषांच्या लांब उडीत श्रीशंकर मुरलीचे आव्हानही प्राथमिक फेरीतच आटोपले.