esakal | निरुपमा, सानियाच्या पंक्तीत अंकिता रैना
sakal

बोलून बातमी शोधा

Ankita-Raina

निरुपमा, सानियाच्या पंक्तीत अंकिता रैना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - आघाडीची टेनिसपटू अंकिता रैनाने प्रगतीचा आलेख उंचावत आणखी एक माइलस्टोन गाठला. महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत १५ क्रमांक प्रगती करीत तिने १९७वा क्रमांक गाठला. पहिल्या २०० जणींत स्थान मिळविलेली ती भारताची तिसरीच महिला टेनिसपटू ठरली. यापूर्वी अशी कामगिरी निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांनी केली होती.

अंकिता २५ वर्षांची आहे. ती मूळ गुजरातची असून, पुण्यात पीवायसी हिंदू जिमखान्यावर हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. सानियानंतर एकेरीत दीर्घ काळानंतर भारतीय स्पर्धकाने इतकी मजल मारली आहे.

स्पर्धक              सर्वोत्तम क्रमांक       वर्ष
निरुपमा वैद्यनाथन     १३४             १९९७    
सानिया मिर्झा              २७              २००७
अंकिता रैना                 १९७             २०१८

मी सातत्याने कसून सराव केला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी मी संयमी राहिले आहे. बराच काळ मी २०० ते २५०च्या मध्ये होते. पुढील मजल मारण्यासाठी काही काळ जावा लागतो. ही वाटचाल खडतर होती. कारकिर्दीत चढउतार येत असताना पालक आणि प्रशिक्षकांचे पाठबळ मोलाचे ठरले.
- अंकिता रैना