IND vs SA : ४५० षटकांचा कसोटी सामना जेव्हा १०७ षटकांत संपतो; खेळपट्टीवरून निर्माण झाले वादंग

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधून भारतीय संघ मायदेशी परतत असल्याने समाधानाचे तर दक्षिण आफ्रिकन गोटात निराशेचे सूर
test cricket match ind vs sa highlights score dispute over cricket pitch
test cricket match ind vs sa highlights score dispute over cricket pitchesakal

केपटाऊन : नियोजित ४५० षटकांचा कसोटी सामना जेव्हा १०७ षटकांत आणि तेसुद्धा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी संपतो तेव्हा खेळपट्टीने खेळाडू आणि संयोजक सगळ्यांना चीतपट केलेले असते. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधून भारतीय संघ मायदेशी परतत असल्याने समाधानाचे तर दक्षिण आफ्रिकन गोटात निराशेचे सूर उमटले आहेत.

आफ्रिकेतील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीला मदत करतात याची सगळ्यांना कल्पना असते. स्थानिक खेळाडूंना त्याची सवय झालेली असते. सतत चेंडू आणि बॅटमध्ये द्वंद्व होताना दिसते, म्हणून दक्षिण आफ्रिकेत सामना बघायला मजा येते. हे सगळे मान्य असले तरी १०७ षटकांचा कसोटी सामना कोणाला पचवता आलेला नाही.

सामन्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत विचार मांडले. तो म्हणाला, ‘‘मला आव्हाने आवडतात. म्हणून मला अशी खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी तयार केली तरी राग येत नाही. मुद्दा इतकाच आहे की जर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचे चेंडू पहिल्या षटकापासून उसळी घेत असले आणि त्याचे कौतुक होत असले,

तर मग भारतात पहिल्या षटकापासून चेंडू वळू लागले तर त्यावर टिका करता काम नये.’’ मालिकेत बरोबरी करता आली असली तरी भारतीय संघातील फलंदाजांना दोन सामन्यात आलेले अपयश लपून राहिले नाहीये. कप्तान रोहित शर्माने संघातील तरुण खेळाडूंची पाठराखण केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com