या संघाचं नाव तरी ऐकलंय का कधी? पण यांनी कांगारुंचा विक्रम मोडलाय

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

महिला टी 20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम थायलंड संघाने आपल्या नावावर केला. थायलंडने टी 20 लीगमध्ये नेदरलॅंड्‌सचा आठ गडी राखून पराभव करताना सलग सतरावा विजय मिळविला. यापूर्वीचा सलग 16 विजयांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.

नवी दिल्ली : महिला टी 20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम थायलंड संघाने आपल्या नावावर केला. थायलंडने टी 20 लीगमध्ये नेदरलॅंड्‌सचा आठ गडी राखून पराभव करताना सलग सतरावा विजय मिळविला. यापूर्वीचा सलग 16 विजयांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता.

महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, थायलंड, इंग्लंड, झिंबाब्वे आणि न्यूझीलंड या पाच संगांनी सलग दहा किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाने अशी कामगिरी दोनवेळा केली आहे. प्रथम त्यांनी सलग 12 आणि नंतर सलग सोळा विजय मिळविले. थायलंडचा हा विक्रम मोडण्याची संधी आता झिंबाब्वे संघाला आहे. झिंबाब्वे क्रिकेट मंडळावर निलंबनाची कारवाई असून, त्यांच्या महिला संघाला महिला टी 20 पात्रता स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. यानंतरही त्यांच्या नावावर सलग 14 विजय आहेत. 

थायलंड संघ सध्या नेदरलॅंड्‌समध्ये चौरंगी क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेथ आयर्लंड आणि स्कॉटलंड या देशांच्या संघाचाही सहभाग आहे. आयर्लंड आणि स्कॉटलंड या महिला टी 20 विश्‍वकरंडक पात्रता फेरीत खेळणाऱ्या संघांवर त्यांनी विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली आहे.

थायलंडने जुलै 2018 मध्ये संयुक्त अरब अमिराती संघावर पहिला विजय मिळविला. तेव्हापासून त्यांचा संघ एकही टी 20 सामना हरलेला नाही. नेदरलॅंड्‌सवर मिळविलेला विजय जबरदस्त होता. त्यांनी नेदरलॅंडस संघाला 54 धावांत गुंडाळले आणि विजयाचे आव्हान आठ षटकांत आठ गडी राखून पार केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thailand Women break T20 record with 17th successive win