esakal | T20 World Cup: पालघरमध्ये जन्मलेला क्रिकेटर ओमानच्या संघातून खेळणार!
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये जन्मलेला क्रिकेटर ओमानकडून खेळणार T20 World Cup

पालघरमध्ये जन्मलेला क्रिकेटर ओमानकडून खेळणार T20 World Cup

sakal_logo
By
संदीप पंडित

नोकरीच्या निमित्ताने अर्नाळाहून ओमानला गेला अन्...

विरार: भारताच्या क्रिकेट संघात गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू येत आहेत. पालघर जिल्ह्या त्याला अपवाद नाही. शार्दूल ठाकूर, आदित्य तरे, राजेश सुतार अशा क्रिकेटपटूंनी काही महिन्यांपासून मैदान गाजवलंय. असे असतानाच अर्नाळा येथील नेस्टर धंबा हा खेळाडू आता चक्क ओमानच्या संघात निवडला गेला आहे. ओमानच्या संघाकडून खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यास तो सज्ज झाला असून टी२० विश्वचषकाच्या माध्यमातूनच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा: T20 World Cup: "रोहित, विराट, धोनी अन् शास्त्री गुरूजी..."

आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला. या स्पर्धेसाठी ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. या संघात वसई तालुक्यातील अर्नाळा येथील नेस्टर धंबा याची निवड झाली. अथक मेहनत, जिद्द आणि क्रिकेटविषयी असणारं प्रेम या जोरावर अर्नाळा येथील नेस्टर धम्बा या तरुणाने थेट सातासमुद्रापार झेप घेतली. नोकरीच्या निमित्ताने ओमानला गेलेल्या नेस्टर धम्बाची ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली. त्याच्या या कामगिरीमुळे सध्या अर्नाळात त्याच्या घरात आणि मित्र-परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

हेही वाचा: T20 World Cup: चहलला का वगळलं? निवड समितीने सांगितलं कारण

नोकरीच्या निमित्ताने गेला अन् क्रिकेट संघात झाली निवड

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या नेस्टरने अर्नाळा समूद्रकिनारी झालेल्या पावसाळी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्या आहेत. घरचा मच्छिमारीचा धंदा, वडील मच्छीमारी बोटीवर खलाशाचे काम करणारे... पावसाळ्यात अर्नाळा समुद्रकिनारी अनेक छोट्या मोठ्या टेनिस क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येतात. यात नेस्टरची गोलंदाजी पाहायला प्रेक्षक आवर्जून हजेरी लावत असत. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांचा सहभाग होता. पाच वर्षांपूर्वी नेस्टरला ओमानला नोकरीच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. तेथे त्याने क्रिकेटवर आपली खेळाची पकड असल्याचे सिद्ध केले. अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या नेस्टरला मिळालेल्या या संधीचे तो कसे सोने करतो, हे काही दिवसात आपल्याला दिसून येणार आहे.

(संपादन- विराज भागवत)

loading image
go to top