

Thane Kabaddi Tournament
sakal
ठाणे : श्री मावळी मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील महिला विभागात रा. फ. नाईक, टागोरनगर मित्र, ज्ञानशक्ती युवा या संघांनी विजयी सलामी दिली. तसेच उत्कर्ष मंडळ, जय बजरंग वाशिंद यांना पहिल्या फेरीत विजय मिळविण्याकरिता ५-५ चढायांचा डाव खेळावा लागला.