Ashes : कागारुंनी पाहुण्या इंग्लंडसमोर ठेवलं डोंगराएवढं लक्ष्य

Ashes Test AUS vs ENG
Ashes Test AUS vs ENGTwitter

The Ashes Series 2021 22 Australia vs England 2nd Test : ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मार्नस लाबुशेने (Marnus Labuschagne) 51 (96) आणि ट्रॅविस हेड (Travis Head) 51 (54) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर ऑस्ट्रेलियाचा कार्यवाहू कर्णधार स्टिव्ह स्मिथने 9 बाद 230 धावांवर डाव घोषीत केला. यजमान ऑस्ट्रेलियाने पाहुण्या इंग्लंडसमोर 468 धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडकडून कर्णधार जो रुट, ओली रॉबिन्सन आणि डेव्हिड मलान यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉडला (Stuart Broad) प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. 11 वर्षात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित राखण्याचं मोठ आव्हानच त्यांच्यासमोर आहे.

मार्कस हॅरिस (Marcus Harris) आणि ( Neser) या जोडीनं 1 बाद 45 धावांवरुन ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. अवघ्या तीन धावांची भर पडल्यानंतर जेम्स अँडरसनने नेसेरला बोल्ड केले. तो 13 चेंडूत 3 धावा करुन तंबूत परतला. 48 धावसंख्येवरच ऑस्ट्रेलियाने मार्कस हॅरिसच्या (Marcus Harris) रुपात तिसरी विकेट गमावली. त्याने 66 चेंडूचा सामना करुन 23 धावा केल्या. ब्रॉडच्या गोलंदाजीवर विकेटमागे जोस बटलरने त्याचा कमालीचा झेल टिपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steven Smith) ही अवघ्या 6 धावांची भर घालून माघारी फिरला.

Ashes Test AUS vs ENG
क्रिकेट_डायरी: Sachin Tendulkar विक्रमी शतक अन् निराशा!

ओली रॉबिन्सनने त्याला बटलरकरवी झेलबाद केले. आघाडीचे चार गडी अवघ्या 14 धावांत गमावल्यानंतर लाबुशेने आणि हेड जोडीनं संघाचा डाव सावरला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी रचली. दोघांनी प्रत्येकी 51-51 धावा करुन संघाची आघाडी भक्कम केली. तळाच्या फलंदाजीत ग्रीनने 43 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. एलेक्स कॅरीनं 6 चेंडू 6 धावा केल्या. तर मिशेल स्टार्कने 20 चेंडूत 19 धावा आणि रिचर्डसनने 8 धावा केल्या.

Ashes Test AUS vs ENG
Video : बटलरचा विकेटमागे जबरदस्त शो; कॅच एकदा बघाच

पहिल्या कसोटी सामन्यात दमदार विजय नोंदवत ऑस्ट्रेलियाने मालिकेत आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयासह ते मालिका विजयाच्या दिशेने आणखी एक पाउल टाकण्याच्या इराद्याने खेळताना दिसत आहेत. दुसरीकडे मोठ्आ धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली आहे. इंग्लंडची सलामी जोडी फोडण्यात कांगारुंना यश आले आहे. रिचर्डसनने हमीदला खातेही उघडू न देता तंबूत धाडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com