धोनी, कोहली, डिव्हिलियर्स वापरतात ती बॅट बनते कशी?

cricket bats
cricket batsgoogle

अहमदनगर ः फूटबॉल, टेनिस आणि क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत. कृष्णलीलांमध्ये चेंडू-फळीचा उल्लेख आला असला तरी आपल्याकडे क्रिकेट इंग्रजांनीच आणले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar Bat) यांनी त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भारतीयांनीच आयपीएलसारखा वेगळा प्लॅटफॉर्म जगाला दिला. त्यामुळे खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळाले. (The bat used in cricket is made of English and willow wood)

क्रिकेट खेळाला सुरवात करायची झाल्यास बॅट आणि बॉल लागतोच. आपल्या हातात सुरूवातीला येते ती प्लॅस्टिकची बॅट. नंतर देशी लाकडाची आणि त्यानंतर दुकानात जाऊन ब्रँडेड बॅट खरेदी केली जाते. तिला कंपनीची बॅट असेही म्हणतात. बॅट बनवण्याचे कारखाने मेरठ, जालंधर, मुंबई, लुधियाना या शहरांमध्ये आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूला स्पेशल बॅट बनवून देणारे कारखाने किंवा कारागीर आहेत.

cricket bats
'देशात दुसरी लाट, मोदींची लोकप्रियता संपवण्यासाठी चीनचा कट'

कोणते लाकूड वापरतात

ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागातही बॅट बनवल्या जातात. विशेषतः परप्रांतीय कारागीर रस्त्याकडेला दुकान थाटून बॅट बनवतात. त्यासाठी वापरले जाणारे लाकूड हे देशी असते. कंपन्यांमधून जी बॅट बनते त्यासाठी काश्मिरी विलो किंवा इंग्लिश विलो (English and willow) वापरतात. काश्मिरी विलो हे वजनाला थोडे जड असते. आणि इंग्लिश विलोची हलके असते. कारखान्यांना परदेशातून इंग्लिश विलो मिळवणे सोपे जाते. काश्मीरमधील विलोचे लाकूड सहजा सहजी मिळत नाही. त्यामुळे कारखाने इंग्लिश विलोचाच वापर करतात. इंग्लंडमध्ये हे विलोची झाडे आहेत म्हणून त्याला तसे नाव पडले आहे.

काश्मीर आणि इंग्लिश विलो

कारखानदार इंग्लिश विलोलाच महत्त्व देतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू इंग्लिश विलोपासून बनलेल्या बॅट वापरतात. इंग्लंड आणि अॉस्ट्रेलियातील कारखाने बॅटसाठी प्रसिद्ध आहेत. बॅटसाठी वेगळे आणि दांड्यासाठी (हँडल)साठी वेगळे लाकूड वापरले जाते. हँडल साधारपणे सिंगापूरहून येतात. इंग्लिश आणि काश्मिर विलो अशा दोनच लाकडापासून बॅट बनतात.

स्ट्रोक कसा मिळतो

पूर्वी स्ट्रोक मिळवण्यासाठी हॅमरचा वापर केला जायचा. काहीजण खालच्या छिद्रातून तेल पाजायचे. परंतु आता कारखान्यात विशिष्ट जागी प्रेस करणाऱ्या मशिन्स आल्या आहेत. त्यामुळे त्या रेडी टू युज अशा असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंच्या बॅट कारखान्यातून अॅकॅडमीत जातात. तेथे नवोदित खेळाडूंना त्या वापरायला दिल्या जातात. पंधरा दिवस किंवा महिनाभरानंतर नॉकिंग केल्यानंतर पुन्हा कंपनीकडे जातात. तेथे फिनिशिंग केले जाते. आणि ज्या खेळाडूने अॉर्डर केली आहे, त्याला दिल्या जातात, असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर, कोच राजू काणे यांनी सांगितले.

देशांतर्गत खेळात सर्वसाधारपणे काश्मिर विलोच्याच बॅट वापरल्या जातात. रणजी किंवा त्यापुढील क्रिकेटमध्ये इंग्लिश विलोच्या बॅटला पसंती दिली जाते. वजनाला हलकी असल्याने तिचा सहज वापर करता येतो. ग्रामीण भागातही आपल्या ऐपतीप्रमाणे इंग्लिश विलोच्या बॅट वापरताना आढळतो, असे रणजीपटू अझीम काझीने सांगतो.

cricket bats
'तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या धोक्याचे पुरावे नाहीत'

बॅटची किंमत

दुकानात गेल्यानंतर ४०० ते ५०० रूपयांपासून बॅटची किंमत सुरू होते. परंतु चांगल्या दर्जाच्या बॅट ३ हजार रूपयांपासून पुढे मिळतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू वापरतात त्या बॅटची किंमत ३५ ते ४० हजारांपासून सुरू होते. स्पेशल एडिशनच्या बॅट (स्पेशल ठराविक खेळाडूसाठी बनवलेली) आणखी महाग जातात. एखाद्या खेळाडूला स्पॉन्सर करण्याची प्रथा आहे. मग ती कंपनी त्या खेळाडूच्या बॅटवर आपला लोगो लावते. त्यामुळे आपल्याला वाटते त्या कंपनीची बॅट आहे. एमआरएफ कंपनी सचिन आणि विराट कोहलीच्या बॅटवर आपली जाहिरात करते. टायर बनवणारी ही कंपनी आता क्रिकेट साहित्यही बनवून लागलीय.

नामांकित ब्रँडस

बाजारात बॅट बनवणारे कारखाने आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंमुळे काही ब्रँड्स प्रसिद्धीला आले आहेत. क्रोबा, न्यू बॅलन्स, बास, एसजी, एसएस, बीडीएम, स्पॅटर्न, एमआरएफ, आदिदास हे ब्रँड्स नावाजलेले आहेत. कोब्रा बॅट वीरेंद्र सेहवाग वापरायचा. न्यू बॅलन्सची बॅट इंग्लंचे खेळाडू वापरतात. धोनीची बॅट स्पॅटर्नची असते. विराट कोहलीचा एमआरएफचा ब्रँड आहे. मध्यंतरी अॉस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने मंगूस (एकदम छोटी) बॅट आणली. तिची चर्चाही झाली. परंतु फार काही चालली नाही. एक खेळाडू किमान आठ ते दहा बॅट वापरतो. ज्या बॅटने सराव करतो, तीच सामन्यात वापरतो. काही खेळाडू डबल ग्रीप वापरतात. काही सिंगल ग्रीप ठेवतात. (बॅटच्या हँडलला लावलेला रबर).

आयसीसीचा नियम

प्रत्येक खेळाडू आपल्याला हवी तशी बॅट बनवून घेऊ लागला होता. काहींची बॅट वजनदार असायची तर काहींची रूंदी मोठी. त्यामुळे आयसीसीने बॅटबाबत काही नियम बनवले आहेत. साधारण एक किलो ४०० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असता कामा नये. लांबी ९६५ एमएम आणि रूंदी ४.२५ म्हणजेच १०८ एमएम. ही स्टँडर्ड साईज आहे. यात काही बदलही झालेत. आयसीसीच्या मेजरमेंटनुसार (Icc) बॅट नसेल तर अंपायर त्या बॅटने खेळू देत नाहीत. सामन्यापूर्वी त्या तपासल्या जातात.

cricket bats
Sachin Waze Case: मुंबई पोलीस दलातील चौथा कर्मचारी बडतर्फ

आयसीसीचे नियम पाळले जातात

मोठे खेळाडू आपल्याला हव्या तशा बॅट कंपनीकडून बनवून घेतात. किंवा त्यांना ज्या कंपनीने प्रायोजकत्त्व दिले आहे. ती कंपनी बॅट पुरवते. बॅटच्या वापराबाबत आयसीसीने घालून दिलेले नियम रणजी ट्रॉफी, मुश्ताक अली ट्रॉफीतही पाळले जातात.

- राजू काणे, (विजय झोलचे कोच, एमसीएचे सिलेक्टर, औरंगाबाद)

हलक्या बॅट वापराव्या

हल्ली स्थानिक स्पर्धामध्येही इंग्लिश विलोच्या बॅट वापरल्या जातात. खेळाडूचे पालक आपल्या मुलाच्या करिअरसाठी २० ते २५ हजार रूपये किंमतीच्या बॅट घेतात. हल्ली गोलंदाजीचा वेग जास्त आहे. त्यामुळे वजनाला हलक्या बॅट वापरल्या पाहिजेत. सचिनसारखे खेळाडू जड बॅट वापरायचे. परंतु नवोदित खेळाडूंनी हलक्या बॅटला पसंती द्यावी. खास सचिन यांच्यासाठी बॅट बनवणाऱ्या कारागीरालाही मी भेटलो आहे.

- सर्फराज बांगडीवाला (कोच, हुंडेकरी स्पोटर्स अॅकॅडमी, अहमदनगर)

(The bat used in cricket is made of English and willow wood)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com