esakal | 'तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोक्याचे पुरावे नाहीत'
sakal

बोलून बातमी शोधा

Corona 3rd wave

ज्यांना आधीच कोरोना झालेला आहे आणि मधुमेहासारखे आजारही आहेत, अशा रुग्णांची प्रतिकारक शक्ती मुळातच कमी झालेली असते त्यामुळे त्यांना काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

'तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या धोक्याचे पुरावे नाहीत'

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ‘‘कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट (Corona 3rd wave) ही लहान मुलांसाठी घातक ठरू शकेल, हे दर्शविणारे कोणतेही ठोस संकेत आतापर्यंत मिळालेले नाहीत,’’ असे केंद्र सरकारने सोमवारी (ता.२४) स्पष्ट केले. ‘एम्स’चे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, की ‘‘ संसर्गाच्या काळामध्ये परीक्षांबाबतच्या अनिश्चिततेमुळे येणारा मानसिक तणाव, शिक्षणाचे नुकसान, स्मार्टफोनची सवय यामुळे मुलांचे आधीच प्रचंड नुकसान झाले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बालकांना आणि मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण आपल्या देशात तुलनेने फार कमी राहिले आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम होऊ शकतो, या दाव्यात वैद्यकीयदृष्ट्या अद्यापतरी कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही.’’ (No indication that children will be affected in third wave of COVID-19 says Central Govt)

हेही वाचा: ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम दोन दिवसांत ब्लॉक होणार?

दोन लाटांचा अनुभव आहे

‘‘ संसर्गाची तिसरी लाट लहान मुलांसाठी हानिकारक ठरेल, या दाव्यांमध्ये बालरोगतज्ञांच्या संघटनांनाही कोणतेही तथ्य आढळलेले नाही त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. देशाजवळ दोन लाटांचा सामना करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणारच असे ठामपणे मानून चालणार नाही. त्याचबरोबर संभाव्य संसर्गाला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा तसेच उपाययोजनांमध्येही कोणत्याही प्रकारची शिथिलता येणे परवडणारे नाही.’’ असेही गुलेरियांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: लसीकरण केंद्रावरही नोंदणी होणार ‘ऑन द स्पॉट’

पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला

देशातील काळ्या बुरशीचे रुग्ण वाढले आहेत असे सांगून गुलेरिया म्हणाले, की ‘‘ज्यांना आधीच कोरोना झालेला आहे आणि मधुमेहासारखे आजारही आहेत, अशा रुग्णांची प्रतिकारक शक्ती मुळातच कमी झालेली असते त्यामुळे त्यांना काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

ही बुरशी नाक, डोळे तसेच डोळ्यांजवळच्या हाडांमध्ये शिरकाव करते आणि झपाट्याने पसरते.’’ दरम्यान उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये सोमवारी पिवळी बुरशीच्या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. पिवळी बुरशी काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. स्टेरॉईड आणि अँटीफंगल औषधाच्या अतिसेवनाने हा आजार होत असल्याचे दिसून आले आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image