Womens Chess Final: जगज्जेतेपदाचा निकाल टायब्रेकमध्ये; अंतिम लढतीचा दुसरा टप्पाही बरोबरीत, दोन्ही खेळाडूंची सावध चाल

Women’s World Chess Championship 2025 final match: महिला बुद्धिबळ विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीतील दुसराही डाव बरोबरीत सुटला आहे.कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात विजेतेपदाचा निकाल टायब्रेकमध्ये लागणार!
Womens Chess Final
Womens Chess Finalsakal
Updated on

बातुमी (जॉर्जिया) : आंध्र प्रदेशची ३८ वर्षीय अनुभवी खेळाडू कोनेरू हंपी व महाराष्ट्राची १९ वर्षीय युवा खेळाडू दिव्या देशमुख यांच्यामधील महिला बुद्धिबळ विश्‍वकरंडकाचा अंतिम फेरीचा दुसरा टप्पाही बरोबरीत (ड्रॉ) राहिला. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यांनंतर हंपी व दिव्या यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाली असून, आता विश्‍वविजेतेपदाचा निकाल उद्या (ता. २८) होणार असलेल्या टायब्रेकमध्ये लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com