
India Vs West Indies 2nd T20I : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धाच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या. भारताकडून युवा फलंदाज तिलक वर्माने पहिल्या टी 20 सामन्याप्रमाणे दुसऱ्याही सामन्यात दमदार खेळी केली.
20 वर्षाच्या तिलकने दुसऱ्याच सामन्यात आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. तिलक वर्मा भारताकडून सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी 20 अर्धशतक झळकावणारा रोहित शर्मानंतरचा दुसरा खेळाडू ठरला. (Tilak Varma First T20 Half Century)
तिलक वर्मा सोडला तर इतर भारतीय फलंदाजांनी निराशाच केली. सूर्यकुमार यादव तर 1 धाव करून धावबाद झाला अन् संजूने 7 धावांचे योगदान देत पॅव्हेलियन गाठले. इशान किशनने 27 तर हार्दिक पांड्याने 24 धावांचे योगदान दिले. विंडीजकडून अकील हुसैन आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हार्दिकचा हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवला नाही. सलामीवीर शुभमन गिल 7 धावा करून बाद झाला. तर सूर्यकुमार यादव अवघी 1 धावेची भर घालून धावबाद झाला.
भारताची अवस्था 2 बाद 18 धावा अशी अवस्था झाल्यानंतर सलामीवीर इशान किशन आणि युवा तिलक वर्माने डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी बॉल टू रन धावा करत भारताला अर्धशतक पार करून दिले.
मात्र शेफर्डने ही जोडी फोडली. त्याने 27 धावांवर इशान किशनला बाद केले. यानंतर आलेला संजू सॅमसन देखील फार काही करू शकला नाही. तो 7 धावा करून बाद झाला. दरम्यान, सेट झालेला तिलक वर्मा आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. त्याच्या साथीला हार्दिक पांड्या देखील आला होता.
या दोघांनी भारताला 15 व्या षटकात शतकी मजल मारून दिली. यावेळी तिलक वर्माने आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये तो 51 धावा करून बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्या देखील 24 धावा करून मोक्याच्या क्षणी बाद झाला.
अक्षरने 12 चेंडूत 14 धावा करत भारताला 140 धावांच्या जवळ पोहचवले. शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने एक चौकार आणि रवी बिश्नोईने एक षटकार लगावत भारताला 152 धावांपर्यंत पोहचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.