ऑलिम्पिकमधून नाओमी करणार कमबॅक; फेडरर-जोकोविचही खेळणार

23 जुलै पासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार असून 24 तारखेपासून हार्ड कोर्टवर टेनिसमधील रंगतदार सामने खेळवण्यात येणार आहे.
Naomi Osaka
Naomi OsakaFile Photo
Updated on

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आईटीएफ) ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची घोषणा केलीये. आयटीएफच्या टोकियो ऑलिम्पिक एन्ट्री लिस्टमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच, स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसट स्टार रॉजर फेडरर यांचा समावेश आहे. मानसिक तणावामुळे फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमधून माघार घेतलेली जपानची नाओमी ओसाका ही देखील ऑलिम्पिक स्पर्धेतून कोर्टवर पुन्हा उतरणार आहे. ऑस्ट्रेलियन अ‍ॅश्ले बार्टीचा देखील महिला एकेरीमध्ये समावेश आहे. अंतिम प्रवेश यादीत बदल होऊ शकतो. (Tokyo 2020 Djokovic Federer Mens Draw and Barty Osaka head field in womens singles)

विम्बल्डन स्पर्धेत खेळत असलेल्या रॉजर फेडररने ऑलिम्पिक खेळण्यासंदर्भातील प्रश्नावर स्पष्ट उत्तर देणं टाळलं होतं. सध्याच्या घडीला विम्बल्डनवर लक्ष केंद्रीत करत असून ऑलिम्पिकसंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्याने मागील आठवड्यात म्हटले होते. 11 जुलै ला विम्बल्डन स्पर्धा संपेल. त्यानंतर जपानमधील टोकियोमध्ये खेळायचे की नाही ते फेडरर ठरवणार आहे. त्यामुळे आयत्या वेळी तो काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Naomi Osaka
द्रविड घेईल शास्त्री गुरुजींची जागा; माजी क्रिकेटरचा अंदाज

जोकोविचने 'गोल्डन स्लॅम पूर्ण करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. 1988 मध्ये स्टेफी ग्राफने एका वर्षातील चारही ग्रँडस्लॅमसह ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करुन गोल्डन स्लॅम पूर्ण केले होते. तिच्याशिवाय अन्य कोणालाही हा पराक्रम करता आलेला नाही. विम्बल्डनसह ऑलिम्पिकमध्ये बाजी मारुन जोकोविचला स्टेफी ग्राफच्या विक्रमाच्या जवळ जाण्याची संधी आहे. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन पाठोपाठ फ्रेंच ओपनचा कोर्ट गाजवलाय.

Naomi Osaka
Euro 2020 : युरो कप सुपर 4 जुगलबंदी

23 जुलै पासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार असून 24 तारखेपासून हार्ड कोर्टवर टेनिसमधील रंगतदार सामने खेळवण्यात येणार आहेत. एरायके टेनिस पार्कवर रंगणाऱ्या सामन्यासाठी जगभरातील 46 देशातील खेळाडू कोर्टवर उतरणार आहेत.

महिला गटातून नंबर वन बार्टी, ओसाका, बेलारुसची एरिना सबालेंका, युक्रेनची एलिना स्वितोलिना कॅनाडाची बियांका आंद्रेस्क्यू, पोलंडची इगा स्वियातेक आणि चेक प्रजासत्ताकची पेट्रा क्विटोव्हा यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com