Tokyo Olympics : जपान देतोय मोठा संदेश, ईकचऱ्यापासून बनवली मेडल्स

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेला आता एक वर्ष बाकी आहे. स्पर्धेच्या अधिकृत "काऊंटडाऊन'ला सुरवात करताना ऑलिंपिक संयोजकांनी स्पर्धेच्या पदकांचे रेखाचित्र सादर केले. विशेष म्हणजे "हाय टेक' ते इको फ्रेंडली अशी घोषणा त्यांनी पुन्हा एकदा दिली. 

टोकियो : पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेला आता एक वर्ष बाकी आहे. स्पर्धेच्या अधिकृत "काऊंटडाऊन'ला सुरवात करताना ऑलिंपिक संयोजकांनी स्पर्धेच्या पदकांचे रेखाचित्र सादर केले. विशेष म्हणजे "हाय टेक' ते इको फ्रेंडली अशी घोषणा त्यांनी पुन्हा एकदा दिली. 

ऑलिंपिकच्या आयोजनासाठी सादर केलेला खर्चाचा आढावा बगून टोकियोला यजमानपदाचा अधिकार कसा काय मिळणार ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. पण, यजमानपद मिळाल्यानंतर आता स्पर्धा अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपली आहे. स्पर्धेच्या तयारीवर अखेरचा हात फिरवायला त्यांनी सुरवात केली आहे. ऑलिंपिकच्या तयारीवरून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक पदाधिकारी देखील सुखावून गेले आहेत. जपानने तयारीचा राखलेला झपाटा पाहून ते चकित झाले आहेत. 

 

ऑलिंपिकसाठी इतक्‍या लवकर एखादे शहर कसे तयार होऊ शकते ? असा प्रश्‍न टोकियोतील तयारी पाहिल्यावर पडतो. ऑलिंरिकला एक वर्षाचा कालावधी असताना येथील ऑलिंपिकची तयारी पूर्ण आहे. खरंच हा वेगळा अनुभव आहे. खऱ्या अर्थाने ही ऑलिंपिक स्पर्धा जबरदस्त होईल. 
-थॉमस बॅश, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती अध्यक्ष

 

हाय टेक ते इको फ्रेंडली 
जपानच्या संयोजकांनी ऑलिंपिक खऱ्या अर्थाने अधुनिक राहिल याची काळजी घेतली आहे. ही काळजी घेताना त्यांनी स्पर्धेच्या पदकापासून ते विजयमंचापर्यंत सर्व गोष्टी या टाकाऊ इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणापासून तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे यासाटी त्यांनी जपानच्या नागरिकांना त्यांच्या टाकाऊ इलेक्‍टॉनिक्‍स वस्तू फेकून न देता संयोजकांकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाह मिळाला असून, ऑलिंपिक खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली होण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे. 

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
संयोजकांचा भार हलका करण्यासाठी जपानचे नागरिक मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. स्वयंसेवकांच्या 80 हजार जागांसाठी तब्बल 2 लाख अर्ज आले आहेत. 

तिकिट विक्री जोरात 
ऑलिंपिकच्या तिकिट विक्रीला देखील तुफान प्रतिसाद मिळत आहे. बेसबॉल खेळाच्या तिकिटासाठी 12 वर्षीय युकीमासा नाकाहारा आईसह पहाटे 5.30पासून रांगेत उभी होती. तिकिट मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. "ऑलिंपिक सुरू होण्याची आता मला उत्सुकता लागून राहिली आहे,'असे ती म्हणाली. संयोजकांच्या माहितीनुसार तिकिटांसाठी निघणाऱ्या लॉटरीसाठी तब्बल 75 लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tokyo 2020 reveals Olympic medals made from old phones