esakal | साताऱ्याच्या ऑलिम्पियनचे आई-वडील खरे चॅम्पियन; PM मोदींची दाद
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi And athletes pravin jadhav

टोकियोसाठी पात्र ठरलेला प्रविणचा प्रवास सहज शक्य झालेला नाही. भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या प्रविणने दोन वर्षांहून अधिक काळ कठोर मेहनत घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या छोट्याशा गावातून तो इथपर्यंत पोहचलाय. मोदींशी संवाद साधताना प्रविणने ऑलिम्पिक पर्यंत धडक मारलेल्या प्रवासाची कहाणीही सांगितली. कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. या गोष्टीचा बावू न करता प्रवास निश्चित केला, असेही तो यावेळी म्हणाला. जिद्दीच्या जोरावर कोणताही अडथळा पार करता, येतो असा संदेशच प्रविणने यावेळी दिला.

साताऱ्याच्या ऑलिम्पियनचे आई-वडील खरे चॅम्पियन; PM मोदींची दाद

sakal_logo
By
सुशांत जाधव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी मोदींनी त्यांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रविण जाधव तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मराठमोळ्या ऑलिम्पियन खेळाडूसह मोदींनी त्यांच्या आई-वडिलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आर्थिक हलाकीतून ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या प्रविण जाधवच्या कुटुंबियांचे मोदींनी विशेष कौतुक केले. आपल्या मुलाला क्रीडा क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी प्रेरणा देणारे पालक खऱ्या अर्थाने चॅम्पियन आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले. (Tokyo Olympic 2020 PM Narendra Modi Interact with athletes praised satara archer pravin jadhav And His Family)

हेही वाचा: आय लव्ह यू यश! कपिल पाजींना अश्रू अनावर

ऑनलाईनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंशी चर्चा केली. प्रविण जाधव शिवाय मेरी कोम, सानिया मिर्झा, दीपिका कुमारी, नीरज चोप्रा, दीपिका कुमारी, पीव्ही सिंधू या खेळाडूंनीही या चर्चेत भाग घेतला होता. कोरोना काळातील संकट, सरावात आलेले अडथळे याशिवाय दुखापतीतून सावरुन देशासाठी खेळण्याच्या जज्बा या सर्व गोष्टींवर मोदींनी खेळाडूंशी चर्चा केली.

loading image