esakal | Olympics Time Table : तिसऱ्या दिवशी या खेळाडूंवर असतील नजरा
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu

Olympics Time Table : तिसऱ्या दिवशी या खेळाडूंवर असतील नजरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Olympics 2020 Day 3 Time Table : ऑलिम्पिक स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी भारताची कामगिरी 'कहीं खुशी कहीं गम' अशा स्वरुपाची राहिली. मीराबाई चानूने लक्षवेधी कामगिरी करत भारताच्या खात्यात पदकाची भर घातली. तिच्या या पदकासह भारत गुणतालिकेत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या दिवशी अनेक दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. बॅडमिंटनमध्ये पदकाची प्रबळ दावेदार असलेली पीव्ही सिंधू, बॉक्सिंगच्या रिंगणात एमसी मेरी कोम यांच्यासह नेमबाजी प्रकारात लक्षवेधी लढती पाहायला मिळणार आहेत. जाणून घ्या तिसऱ्या दिवशीचे भारताचा कोणता खेळाडू कोणत्या मैदानात आपले कसब दाखवण्यास उतरणार आहे याची संपूर्ण माहिती....

टेनिस : महिला दुहेरीची पहिली फेरी सकाळी 7.30 (सानिया मिर्झा-अंकिता रैना).

बॅडमिंटन : महिला एकेरीचे गट साखळी सामने सकाळी 7.10 (पी.व्ही. सिंधू).

जिम्नॅस्टिक : महिला जिम्नॅस्टीकमधील बॅलन्स बीम व फ्लोअर सकाळी 6.30 (प्रणाती नायक)

बॉक्सिंग : महिला 49 किलो गटातील पहिली फेरी दुपारी 1.30 (मेरी कोम), पुरुष 57 किलो गटातील पहिली फेरी दुपारी 3.06 (मनीष कौशिक).

हॉकी : पुरुषांचा दुसरा साखळी सामना दुपारी 3 वाजता ऑस्ट्रेलियाविरुद्ध

रोविंग : पुरुषांची लाइट डबल्स स्कल्स रिपॅजे 2 सकाळी 6.40 (अरविंद सिंग व अरुणलाल 50जाट)

सेलिंग : पुरुषांची लेसर प्रकारातील पहिली शर्यत स्पर्धा सकाळी 11.05, तर दुसरी दुपारी 12.20 (व्ही. सर्वानन), महिलांची लेसर रेडीयल पहिली शर्यत सकाळी 8.35, तर दुसरी शर्यत सकाळी 9.05 (नेत्रा कुमानन)

नेमबाजी : महिलांची 10 मीटर एअर पिस्टल पात्रता फेरी पहाटे 5.30 (मनू भाकर, यशस्विनी देसवाल) आणि अंतिम फेरी सकाळी 7.45.

पुरुषांची स्कीट पात्रता स्पर्धा सकाळी 6.30 (मैराज खान, अंगद बाजवा).

पुरुषांची 10 मीटर एअर रायफल पात्रता स्पर्धा सकाळी 9.30 (दीपककुमार कुमार व दिव्यांश सिंग पन्वर) तर अंतिम फेरी दुपारी 12 वाजता.

जलतरण : महिलांची बॅकस्ट्रोक स्पर्धा (माना पटेल) दुपारी 3.32. पुरुषांची बॅकस्ट्रोक स्पर्धा दुपारी 4.26 (श्रीहरी नटराज).

टेबल टेनिस : महिला एकेरीची दुसरी फेरी दुपारी 12 (मनिका बत्रा) आणि पुरुष एकेरीची दुसरी फेरी सकाळी 10.30 (जी. साथीयान).

loading image
go to top