हॉकीत भारतीय संघाच्या धमाकेदार 'ट्रेलर'मागे चित्रपटाची प्रेरणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Women's Hockey Team

हॉकीत भारतीय संघाच्या धमाकेदार 'ट्रेलर'मागे चित्रपटाची प्रेरणा

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक खेळांमध्ये 10 व्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघाने 3 वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव करत इतिहास रचला. गुरजीत कौर हिने 22 व्या मिनिटाला भारतासाठी एक विनिंग गोल केला. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला संघाने सेमी फायनलमध्ये स्थान मिळविल्याने हा विजय ऐतिहासिक ठरला. महिला संघाच्या आधी पुरुष संघाने ग्रेट बिटला मात देत सेमी फायनलमध्ये एन्ट्री मिळविली आहे. (Tokyo Olympic News in Marathi)

भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य कोच सोर्ड मारजेन यांनी सोमवारी सांगितले की, ''सलग 3 पराभवानंतर संघाचे मानसिक धैर्य खचले होते. पण खेळांडूनी आत्मविश्वास जागविणारा चित्रपट पाहिला आणि संघात नवी ऊर्जा संचारली. त्यानंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिक सेमी फायनलमध्ये पोहचून त्यांनी इतिहास रचला. भारतीय महिला संघाने सलग तीन पराभवानंतर दमदार कॅमबॅक केले. मारजेन म्हणाले की, ''आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात संघासमोर 'करा किंवा मरा'' अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मॅचपूर्वी भारतीय संघाने एक फिल्म पाहिल्यामुळे त्यांना मानसिक बळ मिळाले." पण त्यांनी चित्रपटाचे नाव मात्र गुपितच ठेवले.

कोच मारजेन यांनी विजयाबाबत सांगितले की, ''स्वत:वर विश्वास ठेवणे आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यामुळे अंतर निर्माण झाले आणि भुतकाळाचा विचार करता वास्तविकतेचे भान राखून संघ मैदानात उतरला. ही खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि आम्ही हेच केले. जरी तुम्ही हारला तरी तुम्ही स्वत: वर विश्वास ठेवणे बंद करत नाही आणि मी मुलींना हेच सांगितले. त्याक्षणी जिंकणे सर्वात महत्वाचे असते. मी त्यांना एक चित्रपट दाखविला आणि हा चित्रपट वर्तमानातील जीवनाशी संबधित होता. वास्तविकता यामुळेच मदत झाली असे मला वाटते. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात आम्ही हा चित्रपट डोळ्यासमोर घेऊन खेळलो.'

चित्रपटाचे नाव सांगण्यास नकार देत ते म्हणाले, ''मी याचा उल्लेख माझ्या पुस्तकात केला आहे जे मी लॉकडाऊनच्या काळात भारतामध्ये मला आलेल्या अनुभवांवर लिहिले. तुमचे ध्येय हे नेहमीच उच्च असायला हवे. हेच मी मुलींना सांगितले. जेव्हा तुमचे लक्ष्य मोठे असते तेव्हा तुम्ही गगनाला भिडणारी कामगिरी करता. जर तुमचे लक्ष्य साधारण असेल तर तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागतो. आम्ही गगनाला भिडण्याचे स्वप्न पाहिले. पुढे काय होणार याचा विचार आम्ही करत नाही. आम्हाला आणखी चांगली कामगिरी करायची आहे, असेही ते म्हणाले,

भारतीय महिला संघाची कर्णधार रानी रामपालने चित्रपट पाहणे हाच टर्निंग पाइंट ठरल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली , वास्तविक पाहता या चित्रपटामुळे आम्हाला खूप मदत झाली. फिल्ममुळे आम्हाला वर्तमानातील क्षण जगण्याची प्रेरणा मिळाली. तुमच्या समोर जे आहे त्याचा सामना केला. भुतकाळात काय होईल हा विचार आम्ही बाजूला ठेवला. या गोष्टी आम्हाला चित्रपट पाहिल्यामुळे शक्य झाल्या. 60 मिनिटांवर लक्ष द्या, केवळ 60 मिनिटे आपली भूमिका पार पाडा, असा सल्ला कोचकडून मिळाल्याचेही रानीने सांगितले. पहिल्या 22 मिनिटामध्येच भारतीय संघाने पहिला गोल करत आघाडी घेतली होती. गुरजित कौरने केलेल्या गोलने मिळालेली आघाडी शेवटपर्यंत कामय राखत संघाने दिमाखदार विजय नोंदवला. प्रतिस्पर्धी संघाला 7 पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सविता पुनिया नावाची भिंत भेदण्यात अपयश आले.

Web Title: Tokyo Olympic Coach Margin Reveals The Truth Behind The Indian Womens Hockey Teams Victory

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :tokyo olympic 2020
go to top