ऑलिम्पिक पदक विजेती लवलिनाला मुख्यमंत्री देणार स्पेशल गिफ्ट | Lovlina Borgohain will get appointment letter of DSP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lovlina Borgohain DSP in Assam Police
ऑलिम्पिक पदक विजेती लवलिनाला मुख्यमंत्री देणार स्पेशल गिफ्ट

ऑलिम्पिक पदक विजेती लवलिनाला मुख्यमंत्री देणार स्पेशल गिफ्ट

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारी लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आता पोलिस उपअधीक्षक (Deputy superintendent of police) होणार आहे. याबाबतची माहिती आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आज दिली. (Lovlina Borgohain DSP in Assam Police)

आसाम मुख्यमंत्री कार्यालयने आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा (Himanta Biswa Sarma) हे उद्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या लवलिना बोर्गोहेनला आसाम पोलीस (Assam Police) दलात डीएसपी पदी नियुक्ती झाल्याचे नियुक्तीपत्र देतील अशी माहिती दिली.

टॉकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील लवलिना बोर्गोंहेनचा प्रवास सेमीफायनलमध्येच संपुष्टात आले होते. 69 किलो वजनी गटात पदार्पणातच तिने लक्षवेधी कामगिरी नोंदवली. तुर्कस्तानची विद्यमान विश्वविजेती बुसेनाझ सुरमेनेली हिच्या विरुद्धच्या लढतीतील पराभवामुळे लोवलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top