esakal | Olympics : IOA ची मोठी घोषणा, विजेत्यांवर होणार बक्षीसाची बरसात!
sakal

बोलून बातमी शोधा

tokyo olympics 2020

Olympics : IOA ची मोठी घोषणा, विजेत्यांवर होणार बक्षीसाची बरसात!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : भारतीय ऑलिम्पिक महासंघाने ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मोठी घोषणा केलीये. जगातील मानाच्या स्पर्धेत ज्या खेळाडूला गोल्ड मेडल मिळेल त्याला 75 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे भारतीय ऑलिम्पिक महासंघाने म्हटले आहे. याशिवाय त्या-त्या क्रिडा प्रकारातील महासंघाला बोनस रुपात 25 लाख रुपये देण्यात येतील.

ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकवणाऱ्या खेळाडूला 40 लाख रुपये आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 25 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने एका निवेदनाच्या माध्यमातून याची माहिती दिलीये. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये, स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला 1 लाख रुपये देण्यात यावे, यासंदर्भातील शिफारशीचा उल्लेखही करण्यात आलाय.

हेही वाचा: Olympics : उद्घाटनाला मोजके भारतीय खेळाडू राहणार उपस्थितीत

आयओए महासचिव राजीव मेहता म्हणाले की, पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या पदक विजेत्या खेळाडूंसाठी बक्षीसांची घोषणा करण्यात आली आहे. सल्लागार समितीने स्पर्धेसाठी टोकियोला प्रवास करणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक दिवशी 50 डॉलर भत्ता देण्याची शिफारसही केलीये. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य ऑलिम्पिक महासंघाला प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पहिल्यांदाच मोठ्या संख्येने भारतीय खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात 127 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. मोठ्या प्रमाणात युवा खेळाडूंचा भरणा भारतीय ताफ्यात असून आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पदके भारताला मिळतील, असा विश्वास क्रीडा जगतातून व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडूनही खेळाडूंना उत्तम प्रकारे प्रोत्साहन देण्यात येत असून 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान भारतीय खेळाडू आपली क्षमता सिद्ध करुन देशासाठी किती मेडल जिंकून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image