esakal | Olympics : उद्घाटनाला मोजके भारतीय खेळाडू राहणार उपस्थितीत
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo Olympics Opening Ceremony

Olympics : उद्घाटनाला मोजके भारतीय खेळाडू राहणार उपस्थितीत

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : जपानमधील टोकियोमध्ये रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होण्यासाठी आता अवघे काही तासच उरले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात मोजक्या मंडळींनाच उपस्थिती लावता येणार आहे. भारताकडून 20 अ‍ॅथलिट आणि 6 अधिकारी उद्घाटनाच्या कार्यक्रमात (Tokyo Olympics opening ceremony भाग घेतील. (Tokyo Olympics 2020 20 athletes and six officials to be part of Indian contingent for opening ceremony)

मनिका बत्रा, शरथ कमल, सुतीर्था मुखर्जी, जी साथियान हे टेबल टेनिसमधील खेळाडू कार्यक्रमाला उपस्थितीत असणार आहेत. अमित पंघल, अविनाश कुमार, मेरी कोमयांच्यासह बॉक्सिंगमधील सर्व आठ खेळाडू कार्यक्रमाला हजर असतील. भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित कौर सिंग आणि मेरी कोम ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावताना दिसतील. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताकडून दोन ध्वजवाहकाची निवड करण्यात आली आहे. जगातील मानाच्या स्पर्धेतून या संकल्पनेच्या माध्यमातून भारत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देईल.

हेही वाचा: ENG vs IND : इंग्लंडला मदत करणं टीम इंडियाच्या आलं अंगलट

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत 127 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात भारताला पूर्वीच्या तुलनेत अधिक पदके मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हॉकीनंतर नेमबाजीत सर्वाधिक खेळाडू देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसतील. या क्रीडा प्रकारातही पदकांची बरसात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय बॉक्सिंग आणि कुस्तीतही भारतीय संघ विशेष छाप सोडू शकतो.

हेही वाचा: Olympics : 'सुपर मॉम'कडून पदकी 'पंच'ची अपेक्षा

loading image