Olympics : कोरोनावर मात अन् 'ब्राँझ पंच' लवलिनाबद्दल 5 खास गोष्टी

पदार्पणाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार पंच मारणाऱ्या लवलिनावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. जाणून घेऊयात तिच्या संदर्भातील खास गोष्टी एका नजरेत....
टोकियो ऑलिंपिकमध्ये (tokyo Olympics) पदक निश्चित करणाऱ्या बॉक्सर लवलिना बोर्गोहेनच्या (Lovlina Borgohain) कामगिरीमुळे समस्त देशवासियांना आनंद झाला आहे
टोकियो ऑलिंपिकमध्ये (tokyo Olympics) पदक निश्चित करणाऱ्या बॉक्सर लवलिना बोर्गोहेनच्या (Lovlina Borgohain) कामगिरीमुळे समस्त देशवासियांना आनंद झाला आहे

Tokyo Olympic 2020: आसामच्या 23 वर्षीय लवलिना बोरर्गोहिम(Lovlina Borgohain)सेमीफायनलमध्ये भलेही पराभवाचा सामना करावा लागला असेल. पण मायदेशी परतताना ती पदक घेऊन येणार आहे. भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासात ती तिसरी खेळाडू ठरलीये जिने देशाला ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करुन दिलीये. पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये दमदार पंच मारणाऱ्या लवलिनावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. जाणून घेऊयात तिच्या संदर्भातील खास गोष्टी एका नजरेत....

कोरोनावर मात आणि पदकाला गवसणी...

कोरोनाच्या संकटात ऑलिम्पिक स्पर्धा होणार की नाही, असा संभ्रम असताना नियोजित कालावधीच्या एक वर्षांनी 23 जुलैला स्पर्धेला सुरुवात झाली. खूप कमी लोकांना माहिती असेल की, ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी लवलिनाही कोरोनाच्या जाळ्यात अडकली होती. मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याच्या काही महिन्यापूर्वी तिलाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करुन तिने ट्रेनिंगवर लक्ष केंद्रीत केले. लोवलिनाच्या मेंटोर परारथना यांनी यासंदर्भात खुलासा केलाय.

ऑलिम्पिक खेळणारी अन् आता पदक जिंकणारी आसामची पहिली महिला

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी लवलिना ही आसामची पहिली बॉक्सर ठरली होती. तिने स्पर्धेसाठी पात्र ठरताच राज्यात एकच जल्लोष झाल्याचेही पाहायला मिळाले होते. मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेतेही तिला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीत सहभागी झाले होते. तिच्या अगोदर आसामचा बॉक्सर शिवा थापा याने पुरुष गटातून ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या लोवलिना हिने अर्जून पुरस्कारही मिळवला आहे. हा मानाचा पुरस्कार मिळवणारी आसामची ती सहावी खेळाडू आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये (tokyo Olympics) पदक निश्चित करणाऱ्या बॉक्सर लवलिना बोर्गोहेनच्या (Lovlina Borgohain) कामगिरीमुळे समस्त देशवासियांना आनंद झाला आहे
Olympics : 'लव यू लिना'! भारताच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

किक बॉक्सिंग क्रीडा प्रकारातून केली होती करियरची सुरुवात...

लवलिना हिचे वडील एक छोटे व्यापारी आहेत. तीन मुलींचे संगोपन करण्यासाठी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागलाय. लोवलिनाच्या दोन मोठ्या बहिणींनी किक बॉक्सिंग प्रकारात राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलीये. याच प्रकारात लोवलिनानेही हात आजमावला. स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाने हायस्कूलमध्ये घेतलेल्या ट्रायलनंतर तिचा ट्रॅक बदलला. लोविलनाने प्रसिद्ध कोच पदुम बोरो यांच्या मार्गदर्शनाखाली 2012 पासून बॉक्सिंगच्या ट्रेनिंगला सुरुवात केली.

टोकियो ऑलिंपिकमध्ये (tokyo Olympics) पदक निश्चित करणाऱ्या बॉक्सर लवलिना बोर्गोहेनच्या (Lovlina Borgohain) कामगिरीमुळे समस्त देशवासियांना आनंद झाला आहे
Olympics : पदार्पणात लवलिनाला कांस्य; भारताच्या खात्यात तिसरे पदक

...राष्ट्रकुल स्पर्धेत मिळाली संधी

सातत्याचे परिश्रम, खेळातील सुधारणा करत असताना 2018 मध्ये लवलिनाने राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाली. वेल्टरवेट गटात निवड झाल्याची माहिती तिला प्रसारमाध्यमातून मिळाली होती. राष्टकूल स्पर्धेत ब्रिटनच्या सँडी रियानने तिला पराभूत करत पुढे सुवर्ण पदक जिंकले होते. परंतु या स्पर्धेतून लोवनिला हिला एक आत्मविश्वास मिळाला.

पदके मिळवण्यास झाली सुरुवात...

2 ऑक्टोबर 1997 ला जन्मलेल्या लवलिनाने राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई केल्यानंतर 2018 मध्ये AIBA महिला जागतिक चॅम्पियशिपमध्ये तिने कांस्य पदकाची कमाई केली. याच स्पर्धेत तिने 2019 मध्येही कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेतून तिने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com