esakal | Olympics : तिच्या पिस्टलसह लाखो भारतीयांचे स्वप्न तुटले!
sakal

बोलून बातमी शोधा

Manu Bhaker

Olympics : तिच्या पिस्टलसह लाखो भारतीयांचे स्वप्न तुटले!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारताची युवा नेमबाज मनु भाकेर आणि यशस्विनी सिंह देसवाल यांच्याकडून ऑलिम्पिकमध्ये पदकाची आस होती. महिला गटातील 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात या दोघींना पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. नेमबाजीच्या या प्रकारात मनु भाकेरकडून पदकाची आस होती. पण मोक्याच्या क्षणी तिच्या पिस्टलनेच तिचा घात केला. पात्रता फेरीतील दुसऱ्या राउंडमध्ये मनुच्या पिस्टलच्या इलेक्ट्रॉनिक ट्रिगर सक्रिटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. आणि सर्व काही गडबडले. (tokyo olympics 2020 manu bhakers Out Final Race Due To broken part in her pistol during qualification)

महिला 10 मीटर एअर पिस्टल क्वालिफिकेशन राउंडमध्ये मनुला पराभवाचा सामना करावा लागला. तिने 600 पैकी 575 गुण मिळवत या राउंडमध्ये 12 वे स्थान मिळवले. पहिल्या आठ स्पर्धकांनाच फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे तिचा प्रवास क्वालिफिकेशन राउंडमध्ये थांबला.

हेही वाचा: Olympics : पहिली मॅच सिंधूनं अर्ध्या तासाच्या आत जिंकली

19 वर्षीय मनु भाकेर पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. दुसऱ्या सीरीजनंतर मनुच्या पिस्टलमधील इलेक्ट्रॉनिक ट्रिगर सक्रिट खराब झाल्याच्या पाहायला मिळाले. त्यामुळे तिला कोच आणि जूरी सदस्यांकडे जावे लागले. पिस्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे पाचव्या सीरिजमध्ये तिला जवळपास पाच मिनिटे शुटिंग करता आले नाही. हे तिला चांगलेच महागात पडले. पहिल्या ऑलिम्पिकमध्येच तिच्यावर क्वालिफिकेशन राउंडमध्ये बाहेर पडण्याची वेळ आली.

हेही वाचा: Olympics : जुळ्या बहिणींनी-सायना अंकिताचा खेळ केला खल्लास!

तिच्यापाठापाठ यशस्विनी सिंह देसवाल हिला 13 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 574 अंक नोंदवले. क्वालिफिकेशनमध्ये चीनची जियान रानशिंग अव्वलस्थानी राहिली. तिने 587 अंक मिळवले. मनुच्या पिस्टलमध्ये बिघाड झाला नसता तर चित्र काही औरच दिसले असते.

loading image
go to top