Olympics : जुळ्या बहिणींनी-सायना अंकिताचा खेळ केला खल्लास!

भारतीय जोडीने पहिला सेट एकतर्फी जिंकल्यावरही युक्रेनच्या जोडीने लिहिली विजयाची स्क्रिप्ट
Sania Mirza & Ankita Raina
Sania Mirza & Ankita Raina Twitter

Women's Tennis Doubles : महिला टेनिस दुहेरीत भारताची अनुभवी सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि युवा अंकिता रैना यांना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दोघींनी पहिला सेट 6-0 असा जिंकून दमदार सुरुवात केली. पण युक्रेनच्या जुळ्या बहिणींनी सामन्यात वेगळाच रंग भरला. ल्युडमीला विक्टिरिवना किचेनोक (Lyudmyla Viktorivna Kichenok ) आणि नाडिया विक्टोरिवना किचेनोक (Nadiia Viktorivna Kichenok) या जोडीने दमदार कमबॅक करत सामन्याची विजयी स्क्रिप्ट आपल्या बाजूने लिहिली. (Tokyo Olympics 2020 Women's tennis doubles Sania Mirza Ankita Raina crashes out loses to Kichenok sisters)

Sania Mirza & Ankita Raina
Olympics : पहिली मॅच सिंधूनं अर्ध्या तासाच्या आत जिंकली

पहिला सेट गमावल्यानंतर युक्रेनची जोडी दुसऱ्या सेटमध्येही पिछाडीवर होती. 5-3 अशा पिछाडीवरुन त्यांनी सामना टायब्रेकरमध्ये नेला. दुसरा सेट 7-6 असा आपल्या नावे करत त्यांनी सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या आणि अखेरच्या सेटमध्ये या बहिणींनी सानिया-अंकिताला 10-8 असे मागे टाकले. 1 तास 33 मिनिटे रंगलेला सामना युक्रेनच्या जोडीने 6-0, 7-6, 10-8 असा आपल्या नावे करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.

ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशीचे सर्व अपडेट्स एका क्विकवर

तिसऱ्या दिवशी नेमबाजीमध्ये महिला गटातील 10 मीटर रायफल प्रकारात भारताच्या पदरी निराशा आणि. मनू भाकेर आणि यशस्विनी देसवाल यांच्यावर पात्रता फेरीतच गाशा गुंडाळण्याची वेळ आली. या दोघी अनुक्रमे 12 आणि 13 व्या स्थानावर राहिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com