esakal | Olympics 2020 : सिंधूला चांदीचं सोनं करण्याची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu

Olympics 2020 : सिंधूला चांदीचं सोनं करण्याची संधी

sakal_logo
By
सुशांत जाधव

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधू ही यंदाच्या स्पर्धेतही पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. तिच्याकडून भारताला पदकाची आस आहे. यंदाच्या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरीसह तिने चांदी सोन्यात बदलावी, अशी अपेक्षा क्रीडा रसिकांना आहे. 2012 आणि 2016 'बॅक टू बॅक' ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताला पदक मिळाले होते. भारतीय बॅडमिंटनला नवी दिशा देणारी फुलराणी म्हणजेच सायना नेहवालनं या क्रीडा प्रकारात भारताला पहिलं वहिलं मेडल मिळवून दिलं होतं. तिने कांस्य पदकाने बॅडमिंटनमधील पदकाची सुरुवात केली होती. मागील ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने याच्यापुढे जाऊन रौप्य पदकाची कमाई केली. या चंदेरी क्षणाच्या पुढे जाऊन ती सोनेरी कामगिरी करुन दाखवण्यास उत्सुक असेल. (Tokyo Olympics 2020 Medal Prediction India Badminton Shuttler PV Sindhu Can Repeat History )

कोरियन कोच आणि सिंधूची कामगिरी

2019 मध्ये पीव्ही सिंधून वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिमाखदार यश मिळवले होते. ऑलिम्पिकपूर्वीची तिची हीच सर्वात मोठी कामगिरी आहे. सिंधूकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्यात कोरियाचे कोच पार्क ताई सुंग यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली होती. यावेळीही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पीव्ही सिंधू गत कामगिरीत सुधारणा कण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Tokyo Olympics: महाराष्ट्राच्या 2 शेरनींसह 6 वाघ उतरणार मैदानात

साखळी फेरीत सिंधूसमोर सोपा पेपर

सहाव्या मानांकित पीव्ही सिंधूचा स्पर्धेतील सुरुवातीचा प्रवास हा अगदी सोपा आहे. कोर्टवर स्पर्धेत सिंधूची पहिला लढत 34 व्या मानांकित हाँगकाँगच्या चेउंग नगन यी हिच्या विरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर ती इस्त्राइलची 58 व्या मानांकित केसिया पोलिकारपोवा हिच्या विरुद्ध भिडेल. या दोघींविरुद्धचे पीव्ही सिंधूचे रेकॉर्ड स्ट्राँग आहे. चेउंगविरुद्ध 5 तर पोलिकारपोवा विरुद्ध 2 लढतीत सिंधूचे वर्चस्व राहिले आहे. दोघींना सिंधूला एकदाही नमवता आलेले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सिंधूचा प्रवास सहज आणि सोपा असेल.

तगडी फाईट देण्याची क्षमता

जस-जशी सिंधू पुढच्या फेरीत प्रवेश करेल तस तसे तिच्यासमोरील आव्हाने निश्चितीच वाढतील. चीनची अव्वल मानांकित चेन यू फेईस, तैवानची ताई जू यिंग, जापानची नाजोमी ओकुहारा आणि अकाने यांमागुची, थायलंडची रत्नाचोक इंतेनॉन या पाच जणी क्रमवारीत पीव्ही सिंधूपेक्षा भारी आहेत. क्वार्टर फायनलमध्ये सिंधूला या स्टार शटरलच्या सामन्याला सुरुवात होईल. ताई, ओकुहारा, रत्नाचोक, चेन यू फेई यांच्याकडून शेवटच्या लढतीत सिंधूच्या पदरी पराभव आलय. यामागुची हिला सिंधूने ऑल इंग्लंड स्पर्धेत पराभूत केले होते. पण तिच्या या अव्वल खेळाडूंना थोपवण्याची ताकद निश्चित आहे.

Tokyo Olympics: सिंधूने मानले कोरोनाचे आभार; जाणून घ्या कारण

दिग्गज महिला टेनिस स्टारविरुद्ध सिंधूचा रेकॉर्ड

ताई विरुद्धच्या लढतीत 18 पैकी 13, रत्नाचोक विरुद्ध 10 पैकी 6 सामने सिंधूने गमावले आहेत. या दोघींचे सिंधू विरुद्ध रेकॉर्ड निश्चितच चांगले असले तरी सिंधूने त्यांना पराभूतही करुन दाखवले आहे. दुसऱ्या बाजूला सिंधू- ओकुहारा 10-8 आणि सिंधू- यामागुची यांच्यात 11-7 अशा फरकाने भारतीय शटलर आघाडीवर आहे.

कधीही हार न मानणारी वृत्ती

प्रतिस्पर्धी कोणीही असो सिंधू तगडी फाईट देण्यात सक्षम असणारी खेळाडू आहे. प्रतिस्पर्ध्याची ताकदीने डगमगून न जाता त्याला काँटे की टक्कर देण्यात सिंधू माहिर आहे. हार न मानणाऱ्या खेळाडूंपैकी ती एक असून तिची खेळातील हीच शैली तिला पदकाची दावदारी मजबूत करते.

loading image