esakal | Tokyo Olympics: सिंधूने मानले कोरोनाचे आभार; जाणून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

pv-sindhu

Tokyo Olympics: सिंधूने मानले कोरोनाचे आभार; जाणून घ्या कारण

sakal_logo
By
विराज भागवत

"ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी चाहत्यांची उणीव नक्कीच भासेल, पण..."

नवी दिल्ली: कोरोनामुळे अनेक स्पर्धांच्या संयोजनावर परिणाम झाला. मात्र या ब्रेकमुळेच तंत्र, कौशल्यात सुधारणा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला, असे सिंधूने सांगितले. कोरोनामुळे दीड वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या. त्याचा कामगिरीवर परिणाम झाला, असे अनेक खेळाडूंचे मत आहे. मात्र सिंधूचं मत काहीसं वेगळे आहे. '"या कोरोनामुळे स्पर्धांचा झालेला ब्रेक हा एक प्रकारे पथ्यावरच पडला. पूर्वतयारीवर नक्कीच परिणाम झाला नाही. त्यामुळे सराव भरपूर झाला. अन्यथा स्पर्धा संपल्यावर लगेच सराव पुन्हा स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम असतो. आणि त्यामुळे सरावाला पुरेसा वेळच मिळत नाही. मात्र यावेळी भरपूर सराव झाला. त्या सरावातून मी खूप काही शिकले", असं मत सिंधूने व्यक्त केले. (PV Sindhu Thankful to Coronavirus imposed Break as it gave her time for more practice before Tokyo Olympics)

हेही वाचा: Tokyo Olympics: ऑलिंपिकमुळे कोरोनाचा शून्य प्रसार; IOCचा दावा

गेल्या ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकलेली सिंधू जागतिक क्रमवारीत सातवी आहे. तिला गटात फारसे आव्हान नाही. "माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी चाहत्यांची उणीव नक्कीच भासेल. रिओत खूप उत्साहाचे वातावरण होते. पण न्यू नॉर्मलची आता सवय होत आहे. सराव करतानाही प्रेक्षकांविना लढत कशी होईल, याकडे लक्ष दिले जात आहे", असे ती म्हणाली.

हेही वाचा: Tokyo Olympics 2021: पाच ऑलिम्पिक कर्मचारी कोरोनाबाधित

दरम्यान, यंदा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात म्हणजेच बायो-बबलमध्ये होणार हे सांगितले जात आहे. पण हे कितपत सुरक्षित आहे, अशी विचारणा होत आहे. केनियाच्या महिला रग्बी संघातील खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळले. मात्र या खेळाडू आलेल्या विमानातील एक प्रवासी बाधित आढळला. या खेळाडू त्या व्यक्तीच्या संपर्कात होत्या. मात्र त्यानंतरही संघाचा मुक्काम क्रीडानगरीतच आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.

loading image