esakal | Olympics 2020 : ... म्हणून नीरजकडून पदकाची अपेक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Neeraj Chopra

Olympics 2020 : ... म्हणून नीरजकडून पदकाची अपेक्षा

sakal_logo
By
सुशांत जाधव

जपानमधील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १०० हून अधिक खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय खेळाडूंचा ताफा ऑलिम्पिक स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरात अनेक पदक पडतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. प्रबळ दावेदारांमध्ये भालाफेक नीरज चोप्राचे नावही आघाडीवर आहे. तो भालाफेक प्रकारात देशाला पदकाची कमाई करुन देईल, असे वाटते. त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर तो ही अपेक्षा सहज पेलेले असे दिसते. (Tokyo Olympics 2020 Medal Prediction Indian track and field athlete Neeraj Chopra Javelin Thrower)

2016 मध्ये ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती. वीशीच्या आत त्याने 84.48 मीटर भाला फेकला होता. ज्यूनिअर वर्गवारीतील त्याचा हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. त्यामुळेच त्याच्याकडून पदकाची आस लागून आहे. त्याने हा विश्वविक्रम रिओ ऑलिम्पिक कॉलिफिकेशनच्या शेवटच्या दिवशी नोंदवला होता. पण तो त्यावेळी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नव्हता.

Olympics 2020 : सिंधूला चांदीचं सोनं करण्याची संधी

वर्ल्ड रेकॉर्डनंतर लष्करात प्रमोशन

या लक्षवेधी कामगिरीनंतर इंडियन आर्मीने त्याला नायब सुभेदार पदावर नियुक्ती मिळाली. या सन्मानानंतर नीरजच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. 2018 मध्ये त्याने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्डन कामगिरीची नोंद केली. नीरजने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करताना दिसतोय. 2018 मध्ये जकार्ता आशियाई गेम्स आणि गोल्ड कोस्ट, 2017 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप, 2016 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 2016 मध्ये ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने सुवर्ण कामगिरी नोंदवली होती. 2016 मधील ज्यूनिअर आशियाई चॅम्पियनशिपमधील रौप्यसह त्याने मोठ्या स्पर्धेत देशासाठी 6 पदके जिंकली आहेत.

रिओ ऑलिम्पिकचा रेकॉर्ड

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जर्मनीच्या थॉमसने 87.40, 85.6, 87.07,84.84, आणि 90.30 मीटर अंतर कापत भाला फेकीत सुवर्ण पदक पटकावले होते. केनियन जुलियस येगो याने 88.24 मीटरसह रौप्य आणि त्रिनिदाद आणि टॉबॅगोचा केशोरन वॉलकोट याने 85.38 मीटरसह कांस्य पदकाची कमाई केली होती.

....म्हणून नीरजकडून पदकाची अपेक्षा

2018 च्या आशियाई गेम्समध्ये नीरज चोप्राने 88.06 मीटर अंतर कापत भालाफेकमध्ये राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला होता. इंडियन ग्रँडपिक्स पटियाला येथील स्पर्धेत त्याने या विक्रमात आणखी सुधारणा केली. या स्पर्धेत त्याने 88.07 मीटर भाला फेकण्याचा विक्रम केला. 2021 मधील कोणत्याही खेळाडूने केलीली ही सर्वोच्च कामगिरी आहे. 2020 मध्ये जर्मनीच्या जोहान्स व्हेटर याने 87.27 मीटर अशी सर्वोच्च कामगिरी नोंदवली होती. थोडा जोर लावून ऑलिम्पिकमध्ये नीरज गोल्डला गवसणी घालू शकतो.

loading image