esakal | नीरज चोप्रासह पाकिस्तानी भालाफेकपटूचा फोटो का होतोय व्हायरल?
sakal

बोलून बातमी शोधा

Neeraj Chopra and Arshad Nadeem

नीरज चोप्रासह पाकिस्तानी भालाफेकपटूचा फोटो का होतोय व्हायरल?

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करणारा अर्शद नदीम (Arshad Nadeem) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भालाफेक इवेंटमध्ये (Mens javelin throw) नीरज चोप्राने ग्रुप एमध्ये टॉप कामगिरी केली. त्याने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकला. दुसरीकडे बी ग्रुपमध्ये पाकिस्तानी भालाफेकपटू नदीम 85.16 मीटर भाला फेकत अव्वलस्थानी राहिला. ए ग्रुपमध्ये भारतीय खेळाडू तर बी ग्रुपमध्ये पाकिस्तानी खेळाडू टॉपला राहिल्याचे चित्र जगातील मानाच्या स्पर्धेत पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडू फायनलसाठी पात्र ठरल्यानंतर सोशल मीडियावर या दोघांचा हस्तांदोलन करतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने 88.08 मीटर भाला फेकत सुवर्ण कामगिरी नोंदवली होती. यावेळी चीनचा ली क्युझेन 82.22 मीटर भाला फेकत रौप्य पदक कमावले होते. तर पाकिस्तानचा अर्शद नदीम याने 80.75 मीटर अंतर भाला फेकत तिसऱ्या स्थानासह कांस्य पदकाची कमाई केली होती. मेडल सेरेमनीच्या वेळी नीरज चोप्रा पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम याच्यासोबत हस्तांदोलन करत चर्चा करताना पाहायला मिळाले होते. हाच जुना फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा: Olympics: गुड मॉर्निंग इंडिया; टोकियोत नीरजनं जागवली गोल्डची आस

भालाफेक क्रीडा प्रकारातील दोन्ही ग्रुपमधील मिळून 12 खेळाडू फायनलसाठी पात्र ठरले आहेत. ज्या बी ग्रुपमधून पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम अव्वल राहिला त्या ग्रुपमध्ये भारताच्या शिवपाल सिंग याचाही समावेश होता. मात्र तो ग्रुप बीमध्ये 12 व्या स्थानावर राहिला. फायनलसाठी दोन्ही ग्रुपमधील मिळून अव्वल 12 जण पात्र ठरले आहेत. नीरज चोप्रा दोन्ही गटात अव्वलस्थानी ठरलाय. त्याने जर्मनच्या वर्ल्ड नंबर वन वेटर जॉन्सलाही मागे टाकले आहे. 7 ऑगस्टला 12 जणांमध्ये अव्वलस्थान पटकावत सुवर्ण कामगिरी करण्याची नीरजकडे संधी आहे.

loading image
go to top