esakal | Olympics : सिंधूला पदकाची शेवटची संधी; जाणून घ्या वेळापत्रक
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu

Olympics : सिंधूला पदकाची शेवटची संधी; जाणून घ्या वेळापत्रक

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक स्पर्धा हळूहळू अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. रविवारी भारताचे खेळाडू पाच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात मैदानात उतरल्याचे दिसतील. यातील बॅडमिंटनमध्ये भारताला पदकाची आशा आहे. जाणून घेऊयात रविवारी कोणकोणते खेळाडू ऑलिम्पिकच्या मैदानात उतरणार आहेत. (Tokyo Olympics 2020 PV Sindhu Indian Mens Hockey Boxing schedule sunday 1 August in Marathi)

महिला एकेरी बॅडमिंटन

पीव्ही सिंधू भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा करण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरेल. सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानली गेलेल्या पीव्ही सिंधूला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड नंबर वन ताइ त्झू यिंगने 21-18, 21-12 असे सरळ सेटमध्ये सिंधूची विजयी घोडदौड रोखली. आता कास्य पदकाची सिंधूची लढत चिनच्या बिंग जिआवो (Bing Jiao) हिच्या विरुद्ध रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता ही लढत रंगणार आहे. सिंधू आणि बिंग यांच्यात 15 लढती झाल्या आहेत. यात सिंधूला 6 सामन्यात यश मिळाले आहे.

हेही वाचा: Hockey: विक्रमी खेळीसह वंदनाची वडिलांना श्रद्धांजली (VIDEO)

हॉकी

पुरुष क्वार्टर फायनल

भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन

सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटे

सध्याच्या घडीला भारतीय संघ वर्ल्ड रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ग्रेट ब्रिटन संघ सहाव्या स्थानावर आहे. 1948 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत या दोन्ही संघात सुवर्ण पदकासाठी लढत रंगली होती. यात भारतीय संघाने बाजी मारली होती. त्यानंतर या दोन्ही संघात ऑलिम्पिकमध्ये लढत झालेली नाही.

हेही वाचा: Olympics : डेटिंग अन् प्रेमाची सेटिंग; पाहा ऑलिम्पियन कपल

बॉक्सिंग

पुरुष सुपर हेवीवेट (+91 किलो वजनी गट), क्वार्टर फायनल

भारताचा सतिश कुमार विरुद्ध उज्बेकिस्तानचा जलोलोव बाकहोदिर JALOLOV Bakhodir

वेळ : सकाळी 09 वाजून 36 मिनिटे

सुपर हेवी वेट क्रीडा प्रकारात पहिल्यांदा एखादा भारतीय बॉक्सर स्पर्धेत उतरला आहे. सतिश कुमारने जर हा सामना जिंकला तर भारताचे आणखी एक पदक निश्चित होईल.

गॉल्फ

पुरुष वैयक्तिक स्ट्रोक प्ले राउंड 4

उदयन माने आणि अनिर्बन लाहरी

दुपारी चार नंतर

घोडेस्वारी

फौवाद मिर्झा (Seigneur Medicott )

loading image
go to top