esakal | Olympics: टॉप क्लास मनू-सौरभ पदकाच्या शर्यतीतून बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

Manu Bhaker and Saurabh Chaudhary

Olympics: टॉप क्लास मनू-सौरभ पदकाच्या शर्यतीतून बाहेर

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo 2020 Olympics Shooting : 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात दिमाखात फायनलपर्यंत पोहचलेल्या युवा जोडीने पाचव्या दिवशी पदाकाच्या आशा पल्लवित केल्या. पण फायनलमध्ये त्यांना टॉप क्लास कामगिरी करण्यात अपयश आले. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडी देशाला दुसऱ्या पदकाची कमाई करुन देतील, असे वाटत होते. या दोघांनी क्वालिफिकेशन राउंडमध्ये अव्वलस्थान मिळवत फायनल गाठली होती. पण फायनलमध्ये त्यांना सातव्या स्थानावरच समाधान मानावे लागले.

2019 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत या जोडीने भारताला एअर पिस्टल प्रकारात तीन गोल्ड मेडल जिंकून दिली होती. त्यामुळेच त्यांच्याकडून पदकाची आस होती. त्यांनी सुरुवातही चांगली केली. पण त्यात सातत्य राखण्यात त्यांना अपयश आले. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांच्यासह अभिषेक वर्मा आणि यशस्वी सिंग देसवाल देखील मैदानात उतरले होते. पात्रता फेरीतील स्टेजमध्येच अभिषेक वर्मा आणि यशस्वी जैयसवाल यांचा प्रवास थांबला. त्यांना 17 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे पाचव्या दिवशी नेमबाजीतून निर्माण झालेली पदकाची आस काही क्षणांतच संपुष्टात आलीये.

हेही वाचा: Medal Tally : यजमान अव्वल; 51 देशांच्या खात्यात किमान 1 पदक

यापूर्वी महिला 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू आणि यशस्विनी यांना अपयश आले होते. या दोघींना पहिल्या आठमध्येही स्थान मिळवता आले नाही. दुसरीकडे पुरुष एकेरीत अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांच्या पदरी निराशा पडली होती. अभिषेकला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता. दुसरीकडे सौरभ चौधरीने अंतिम आठमध्ये स्थान मिळवले पण त्याला सातव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले.

loading image
go to top