esakal | Tokyo Olympics 2021 Medal Tally :
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo Olympics

Medal Tally : यजमान अव्वल; 51 देशांच्या खात्यात किमान 1 पदक

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2021 Medal Count : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत यजमान जपानने चीनला मागे टाकत पदतालिकेत (Medal Table) अव्वल स्थान पटकावले आहे. 26 जैलपर्यंत पार पडलेल्या वेगवेगळ्या खेळात जपानने 8 सुवर्ण पदकासह 2 रौप्य आणि 3 ब्राँझसह एकूण 13 पदकांची कमाई केलीये. त्यांच्यापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिकेने 7 सुवर्ण, 3 रोप्य आणि 4 ब्राँझसह 14 पदके जिंकली आहेत. पदतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या खात्यात सर्वाधिक 18 पदके आहेत. त्यांनी 6 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 ब्राँझ पदकांची कमाई केलीये. पण जपान आणि अमेरिकेने अधिक सुवर्ण पदकाची कमाई करत चीनपेक्षा सरस कामगिरी केलीये. रशियन ऑलिम्पिक कमिटी (सुवर्ण-4 रौप्य-5 ब्राँझ-3 ) आणि ग्रेट ब्रिटन ((सुवर्ण-4 रौप्य-5 ब्राँझ-3 ) अव्वल पाचमध्ये आहेत. (Tokyo Olympics 2021 medal count updates Japan On Top You Know India Ranking in country medal table After 26 July)

जगभरातील 205 देशांचा समावेश असणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत 51 देशांनी किमान एक पदक पटकावले आहे. यात एका रौप्य पदकासह भारत 34 व्या स्थानावर आहे. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूनं स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला हे एकमेव पदक मिळवून दिले होते. भारतासह बेल्जियम, रोमानिया, बल्गेरिया, कोलंबिया, डेन्मार्क, जार्डन अशा एकूण सहा देशांच्या खात्यात केवळ एक रौप्य आहे.

हेही वाचा: याला म्हणतात 'नेम'; रिटायरमेंटच्या वयात पटकावलं मेडल

कझाकिस्तान, जर्मनी, युक्रेन, मंगोलिया, तुर्की, इजिप्त या सहा देशांच्या खात्यात प्रत्येकी 2-2 ब्राँझ जमा झाली आहेत. इस्टोनिया, इस्त्रायल, मॅक्सिको,न्यूझीलंड, कुवेत,इवोरी कोस्ट या राष्ट्रांनी ब्राँझच्या रुपात एकमेव पदक मिळवले आहे. तर रशिया, केनिया, जमेका, ग्रीस आणि अर्जेंटिना यासारखे अनेक देश पहिल्या पदकाच्या प्रतिक्षेत आहेत.

हेही वाचा: ऑलिम्पिकच्या गर्दीत लक्षवेधी ठरलेल्या चानूला मिळणार खाकी वर्दी!

पदतालिका

भारत India (सुवर्ण-0 रौप्य-1 ब्राँझ-0 )

जपान Japan: (सुवर्ण-8 रौप्य-2 ब्राँझ-3 )

अमेरिका US: (सुवर्ण-7 रौप्य-3 ब्राँझ-4)

चीन China: (सुवर्ण-6 रौप्य-5 ब्राँझ-7 )

रशियन ऑलिम्पिक कमिटी ROC: (सुवर्ण-4 रौप्य-5 ब्राँझ-3 )

ग्रेट ब्रिटन Great Britain: (सुवर्ण-3 रौप्य-3 ब्राँझ-1 )

रिपब्लिक ऑफ कोरिया Republic of Korea: (सुवर्ण-3 रौप्य-0 ब्राँझ-4 )

ऑस्ट्रेलिया Australia: (सुवर्ण-2 रौप्य-1 ब्राँझ-1 )

कोसोवो Kosovo: (सुवर्ण-2 रौप्य-० ब्राँझ-० )

इटली Italy: (सुवर्ण-1 रौप्य-4 ब्राँझ-4 )

फ्रान्स France (सुवर्ण-1 रौप्य-2 ब्राँझ-2 )

कॅनडा Canada: (सुवर्ण-1 रौप्य-2 ब्राँझ-1 )

हंगेरी Hungary: (सुवर्ण-1 रौप्य-1ब्राँझ-0 )

ट्युनेशिया Tunisia: (सुवर्ण-1 रौप्य-1ब्राँझ-0 )

स्लोवेनिया Slovenia: : (सुवर्ण-1 रौप्य-०ब्राँझ-1 )

ऑस्ट्रिया Austria: : (सुवर्ण-1 रौप्य-0 ब्राँझ-0 )

इक्वेडोर Ecuador: (सुवर्ण-1 रौप्य-0 ब्राँझ-0 )

हाँकाँग Hong Kong: (सुवर्ण-1 रौप्य-0 ब्राँझ-0 )

loading image
go to top