जातीवाचक वादावर वंदना कटारियाची पहिली प्रतिक्रिया

वंदना कटारिया ऑलिम्पिक स्पर्धेत गोलची हॅटट्रिकची किमया करुन दाखवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
Vandana Katariya
Vandana Katariya Twitter

भारतीय महिला हॉकी संघातील स्टार खेळाडू वंदना कटारियाने जातीवाचक शिवीगाळ प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिलीये. आम्ही देशासाठी खेळतो. कुटुंबियांसोबत झालेल्या प्रकाराची माहिती ऐकायला मिळाली. पण जोपर्यंत त्यांच्याशी संवाद होत नाही तोपर्यंत या प्रकरणावर अधिक काहीच बोलणार नाही, असे ती म्हणालीये.

26 वर्षीय वंदना कटारिया ऑलिम्पिक स्पर्धेत गोलची हॅटट्रिकची किमया करुन दाखवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत ग्रेट ब्रिटनविरुद्धही तिने एक गोल डागला होता. ऑलिम्पिक स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघाला अर्जेंटिना विरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर उत्तराखंडमधील वंदना कटारियाच्या घरासमोर फटाके फोडण्यात आले होते. यावेळी तिच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे समोर आले होते. वंदना कटारिया ही उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रोशनाबाद येथील आहे. तिच्या घरासमोर घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर पोलिसांनी दोघांना अटकही केलीये.

Vandana Katariya
IND vs ENG : यजमान इंग्लंड 70 धावांनी पिछाडीवर

इंडियन एक्स्पेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये वंदना म्हणाली की, आपण केवळ हॉकीसंदर्भात विचार करायला हवा. आम्ही सर्व देशासाठी खेळतो. जो काही जातीयवादाचा प्रकार ऐकायला मिळतोय ते थांबवायला हवे. कोणत्याही मुद्यावर आपण ऐक्य दाखवायला हवे, असे मतही तिने व्यक्त केले. सध्याच्या घडीला फोन स्विच ऑफ असतो. त्यामुळे कुटुंबियांसोबत याविषयावर बोलण झालेलं नाही. त्यांच्यासोबत संवाद झाल्यानंतरच याप्रकरणावर बोलेन, योग्य ठरेल.

Vandana Katariya
Olympics: टॉप क्लास मनू-सौरभ पदकाच्या शर्यतीतून बाहेर

वंदना कटारियाचे फेक ट्विटर अकाउंट

भारतीय महिला हॉकी संघातील स्टार खेळाडू वंदना कटारिया हिचे एक फेक ट्विटर अकाउंटही तयार करण्यात आले आहे. यासंदर्भातही वंदनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केलीये. सध्याच्या घडीला कुटुंबिय अडचणीचा सामना करत आहेत. त्यांच्या अडचणीत आणखी भर घालू नका, अशी विनंती वंदनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन केलीये. vandankatariya हे माझे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे. काही लोकांनी olympicvandana आणि vandanahockey vandanahockey या नावाने फेक अकाउंट तयार केले आहे. हे फेक अकाउंट असल्याचे तिने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com