esakal | ऑलिंपिक रद्द झाल्यास जपानला १७ अब्ज डॉलरचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

ऑलिंपिक रद्द झाल्यास जपानला १७ अब्ज डॉलरचा फटका

ऑलिंपिक रद्द झाल्यास जपानला १७ अब्ज डॉलरचा फटका

sakal_logo
By
नामदेव कुंभार

japan olympics 2021 : टोकिय - ऑलिंपिक क्रीडास्पर्धा जेमतेम अडीच महिन्यांवर आली आहे; पण जगातील सर्वात मोठ्या क्रीडासोहळ्याबाबतची अनिश्चितता कोरोनाच्या महामारीमुळे अद्याप कायम आहे. स्पर्धा होईलच, याची ग्वाही कुणीही ठामपणे देण्यास तयार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जपानमध्ये लसीकरणाचा वेग मंद आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बहुचर्चित ऑलिंपिक स्पर्धा रद्द झाली, तर जपानला १७ अब्ज डॉलरचा फटका बसू शकेल आणि हा त्यांच्यासाठी मोठा फटका असेल, असे एका अहवालत स्पष्ट करण्यात आले आहे. (Tokyo Olympics cancellation could cost Japan up to 17 billion)

दोन महिन्यांवर आलेल्या ऑलिंपिक स्पर्धेचे भवितव्य अजूनही टांगणीवर आहे. एकीकडे स्थानिक जपानवासींचा कठोर विरोध सुरू असताना दुसरीकडे संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती स्पर्धा निश्चित कार्यक्रमानुसार खेळवण्यास तयार आहे. या मेगा स्पर्धेची तयारीही पूर्ण झालेली आहे. अशा परिस्थितीत जर स्पर्धा रद्द झाली, तर १७ अब्ज डॉलरचा तोटा जपानला सहन करावा लागेल.

हेही वाचा: WTC : चॅम्पियन्स रुबाबसाठी हिटमॅनचा तोरा ठरेल महत्त्वाचा

जपानमध्ये पुन्हा कोरोनाची लाट आलेली आहे आणि अनेक शहरांत आणीबाणी लावण्यात आलेली आहे. या आणीबाणीमुळे अगोदरच जपानची अर्थव्यवस्था कमकुवत होऊ लागली आहे. ‘स्पर्धा होणारच,’ असं जपानचे पंतप्रधान योशिहिदे सागा हे काही आठवड्यांपूर्वीपर्यंत सांगत होते; पण आता ‘सरकारसाठी ऑलिंपिक सर्वात महत्त्वाचं नाही,’ असं ते सांगत आहेत.

हेही वाचा: WTC Final : 'रोहित-विराट नव्हे पंतची भिती वाटतेय'

जपानसाठी ही स्पर्धा मोलाची आहे. पुढील वर्षी चीनमध्ये हिवाळी ऑलिंपिक आहे. चीन आणि जपान हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. या स्पर्धेच्या निमित्तानं चीनवर कुरघोडी करण्यास जपान उत्सुक होता. आता स्पर्धा पुन्हा लांबवण्याचं ठरलं, तर चीनमधील हिवाळी ऑलिंपिकबाबत निर्णय घ्यावा लागेल.