VIDEO पीव्ही सिंधू मायदेशी परतली, पाहा काय म्हणाली

देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करुन मायदेशी परतल्याचा आनंद
PV Sindhu
PV SindhuTwitter

भारतीय संघाला दुसऱ्या पदकाची कमाई करुन देत ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचणारी बॅडमिंटन स्टार सिंधू मायदेशी परतली आहे. सेमी फायनलमध्ये पराभवानंतर मोठ्या संयमाने जिगरबाज खेळ करत पीव्ही सिंधूने चीनच्या बिंगजिओला सरळ सेटमध्ये पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले.

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य आणि त्याच्यापाठोपाठ टोकियोतील कांस्य पदकासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे. देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करुन मायदेशी परतल्याचा आनंद आहे, अशी भावना तिने व्यक्त केली. यावेळी तिने भारतीय बॅडमिंटन असोसिएशन आणि प्रात्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

PV Sindhu
ऑलिम्पियन प्रवीण जाधवचं कुटुंब सातारा जिल्हा सोडणार

जपानची राजधानी टोकियोत इतिहास रचणारी सिंधू मंगळवारी दिल्ली विमानतळावर दाखल झाली. मायदेशी परतल्यानंतर तिच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. सलग दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये असा पराक्रम करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिचा दुसरा नंबर लागतो. यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमारने अशी कामगिरी केली होती.

PV Sindhu
ENG vs IND 1st Test: कसोटी क्रिकेटबद्दल कोहलीचं मोठं वक्तव्य

दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर पीव्ही सिंधून हा क्षण आनंदी असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, मी खूप आनंदी आहे. बॅडमिंटन असोसिएशनसह पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती सुवर्ण कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र चायनीज ताइपेच्या ताइने सिंधूला सेमीफायनलमध्ये पराभूत केले. या पराभवातील दडपणानंतर कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने दिमाखदार कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com