esakal | Paralympics : प्रवीणच्या चंदेरी कामगिरीला विक्रमाची झालर
sakal

बोलून बातमी शोधा

praveen kumar

Paralympics : प्रवीणच्या चंदेरी कामगिरीला विक्रमाची झालर

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Paralympics 2020 : जपानची राजधानी टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडलीये. उंच उडी क्रीडा प्रकारात भारताच्या प्रवीण कुमारने नवा विक्रम प्रस्थापित करत रौप्य पदकाची कमाई केलीये. प्रवीणने Men’s High Jump T64 प्रकारात 2.07 मीटर उंच उडी मारली. या कामगिरीसह त्याने नवा आशियन विक्रम आपल्या नावे नोंदवलाय. संपूर्ण इव्हेंटमध्ये प्रवीण कुमार सर्वोत्तम दिसत होता. तो सुवर्ण उडी मारेल, असेच वाटत होते. पण अखेरच्या क्षणी पोलंडच्या जॉनाथन याने 2.10 मीटर उंची उडी मारत सुवर्ण पदकावर कब्जा केला. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे 11 वे पदक आहे.

प्रवीण आणि पोलंडचा जोनाथन यांच्या कांटे की टक्कर पाहायला मिळाली. गोल्डसाठी दोघांच्यात सामना अटितटिचा खेळ रंगला होता. अखेरच्या क्षणाला जोनाथनने 2.10 मीटर उडी मारत सुवर्ण पक्क केले. प्रवीणला त्याची बरोबरी करता आली नाही. त्यामुळे त्याला रौप्यवरच समाधान मानावे लागले.

हेही वाचा: INDvsENG 4th Test Day 1: तोच स्विंग, तीच पडझड!

रौप्य पदक विजेत्या प्रवीणवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याचे अभिनंदन केले. प्रवीणची कामगिरी अभिमानास्पद असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही प्रवीणच्या कामगिरीचं कौतुक केल्याचे पाहायला मिळते. पॅरालिंपिकच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे 54 खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे मोठ्या पदकाची आस होती. अखेर ते साध्य झाल्याचे चित्र दिसत आहे. पहिल्यांदाच भारताने पदकांचा दुहेरी आकडा पार केलाय.

loading image
go to top