esakal | INDvsENG 4th Test Day 1: तोच स्विंग, तीच पडझड!
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

INDvsENG 4th Test Day 1: तोच स्विंग, तीच पडझड!

sakal_logo
By
सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा

ओव्हल (लंडन), : विराट कोहलीचा नाणेफेक गमावण्याचा, इंग्लिश गोलंदाजांचा चेंडू स्विंग करण्याचा आणि भारतीय फलंदाजांचा बाद होण्याचा ‘ये रे माझ्या मागल्या’चा खेळ ओव्हल कसोटीतही चालू राहिला. कोहलीचे अर्धशतक आणि त्यानंतर शार्दुल ठाकूरने प्रतिआक्रमण करत केलेल्या ५७ धावांमुळे भारताला चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर दिवस अखेर इंग्लंडचे तीन फलंदाज ५३ धावांत बाद करून लढण्याची जिगर दाखवली.

४ बाद ६९ असा संकटात सापडलेल्या भारताचा डाव विराट कोहलीने सावण्याचा प्रयत्न केला तरी भारताची ७ बाद १२७ अशी अवस्था झाली होती, परंतु ईशांत शर्माऐवजी संधी देण्यात आलेल्या शार्दुलने सात चौकार आणि तीन षटकारांसह ५७ धावांची खेळी करून लाज राखली.

संघात नव्याने दाखल झालेल्या वोक्सने गोलंदाजीला आल्यावर पहिल्याच षटकात रोहितला चांगला चेंडू टाकून झेलबाद करवले. तीन चौकार मारणाऱ्या राहुलला ओली रॉबिन्सच्या आत येणाऱ्या‍ चेंडूने पायचित केले आणि पुजाराने उजव्या स्टम्पबाहेरच्या चेंडूचा पाठलाग करायची सवय सोडली नाही.

हेही वाचा: Video: अजिंक्य रहाणेचा मोईन अलीने घेतलेला भन्नाट झेल पाहिलात?

संक्षिप्त धावफलक : भारत, पहिला डाव : ६१.३ षटकांत सर्वबाद १९१ (रोहित शर्मा ११, केएल राहुल १७, चेतेश्वर पुजारा ४, विराट कोहली ५०, रवींद्र जडेजा १०, अजिंक्य रहाणे १५, रिषभ पंत ९, शार्दुल ठाकूर ५७, ऑली रॉबीन्सन ३८-३, वोक्स ५५-४). इंग्लंड, पहिला डाव ः १७ षटकांत ३ बाद ५३ (डेव्हिड मलान खेळत आहे २६, ज्यो रूट २१, जसप्रित बुमरा १५-२, उमेश यादव १५-१)

हेही वाचा: शार्दूलचा इंग्लंडला मराठमोळा दणका! षटकार ठोकत केलं अर्धशतक

जडेजाचीच निवड

ओव्हल कसोटी सामना चालू होण्याअगोदर भारतीय संघात कोणाचा समावेश होणार याची चर्चा रंगली होती. सगळ्यांना वाटत होते, की अश्विनचा समावेश नक्की होणार. नाणेफेकीच्या वेळी विराट कोहलीने संघ जाहीर करताना परत एकदा अश्विनला जागा न घेण्याचा निर्णय घेतला, जो बहुतांशी लोकांना धक्का देऊन गेला.

loading image
go to top