esakal | Paralympics : मूर्ती लहान पण किर्ती महान; कृष्णाला सुवर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Krishna Nagar

Paralympics : मूर्ती लहान पण किर्ती महान; कृष्णाला सुवर्ण

sakal_logo
By
सुशांत जाधव

पॅरालिंपिक स्पर्धेतील पाचव्या सुवर्ण पदकासह पदतालिकेत भारत 24 व्या स्थानावर

Tokyo Paralympics 2020: भारतीय बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने (Krishna Nagar) देशासाठी आणखी एक पदक जिंकले आहे. पॅरालिंपिक पुरुष गटातील एकेरीच्या SH 6 वर्गवारीच्या अंतिम सामन्यात नागर आणि हाँकाँगचा च्यु मॅन काय यांच्यात सामना रंगला होता. यात कृष्णाने बाजी मारली. कृष्णाने पहिला सेट 21-17 असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये हाँकाँगच्या प्रतिस्पर्धीने कमबॅक करत सेट 21-16 जिंकून सामना बरोबरीत आणला. अंतिम सेटमध्ये दोघांच्यात तगडी फाइट झाली. यात कृष्णाने 21-17 असा विजय नोंदवला. पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने मिळवलेले हे 19 वे पदक आहे. यात 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिंपिकच्या इतिहासातील बॅडमिंटनमधील हे दुसरे सुवर्ण पदक ठरले.

कृष्णा नागरपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या 33 वर्षीय प्रमोद भगत (Pramod Bhagat) ने SL 3 वर्गवारीत बॅडमिंटनमधील पहिले सुवर्ण पदक जिंकले होते. त्याच्यापाठोपाठ सुहास एल. यथिराजने रौप्य पदकाची कमाई केली होती. बॅडमिंटनमध्ये मनोज सरकार यानेही कांस्य पदकाची कमाई केलीये.

हेही वाचा: Paralympic : भारताचे सुवर्णस्वप्न भंगलं, सुहास यथिराजला रौप्य

ज्याच्या उंचीतील विकास खुंटलेला असतो. जे स्पर्धेक ठेंगणे असतात त्यांचा SH6 वर्गवारीत समावेश होता. कृष्णा दोन वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबियांना आपल्या मुलाच्या उंचीबाबत समस्या असल्याचे समजले. कोणत्याही प्रकारचा उपाय नसलेल्या या आजाराचा कोणताही न्यूनगंड न बाळगता कृष्णाची पावले खेळाकडे वळली. घरापासून जवळपास 13 किमी असलेल्या ट्रेनिंग सेंटरवर जाऊन कृण्णा अगदी मन लावून सराव करायचा. टोकियो स्पर्धेत देशाची मान उंचावत त्याने उंची लहान पण किर्ती महान याची खरी झलक दाखवून दिलीये.

loading image
go to top