esakal | Paralympics : मनिष नरवालचा सुवर्ण वेध; सिंहराजलाही रौप्य
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Narwal

Paralympics : मनिष नरवालचा सुवर्ण वेध; सिंहराजलाही रौप्य

sakal_logo
By
सुशांत जाधव

नेमबाजीतील या दोन पदकासह भारताच्या खात्यात 15 पदकांची नोंद झालीये.

Paralympics 2020 Manish Narwal wins Gold : टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत मनिष नरवाल याने 50 मीटर पिस्टल SH 1 प्रकारात सुवर्ण वेध साधलाय. त्याच्यापाठोपाठ सिंहराज अधाना याने दुसऱ्या क्रमांकावर राहत रौप्य पदकाची कमाई केली आहे. नेमबाजीतील या दोन पदकासह भारताच्या खात्यात 15 पदकांची नोंद झालीये. 19 वर्षीय नरवालने पॅरालिंपिकमध्ये नवा रेकॉर्ड प्रस्थापित करत 218.2 गुणासंह सुवर्ण पदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे गोल्ड ठरले. पुरूषांच्या एअर पिस्टल SH1 क्रीडा प्रकारात मंगळवारी कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या सिंहराज अधाना याने 216.7 गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली.

जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांचा अक्षरश: धमाका उडवून दिलाय. पॅरालिंपिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारताने सर्वाधिक पदकांची नोंद केलीये. यापूर्वी 11 व्या दिवशी बॅडमिंटन स्टार प्रमोद भगतने भारताचे आणखी एक मेडल पक्के केले आहे. त्याने फायनल गाठली असून त्याला किमान रौप्य पदक मिळणार हे निश्चित झाले आहे.

हेही वाचा: IND vs ENG : टीम इंडिया पिछाडीवरुन धमाका करण्यात माहिर; पण...

बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या SL4 गटात तरुण धिल्लोन याला पराभवाचा सामना करावा लागला. तरीही त्याची पदकाची आस कायम आहे. तो ब्राँझ पदकासाठी कोर्टवर उतरेल. सुहास यथिराजने पुरुष एकेरीच्या SL4 गटात दमदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला असून त्याने भारताचे रौप्य पदक पक्के केले आहे.

loading image
go to top