esakal | Tokyo Paralympics: भारतासाठी बुधवारचा दिवस निराशाजनक!
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo Paralympics: भारतासाठी बुधवारचा दिवस निराशाजनक!

Tokyo Paralympics: भारतासाठी बुधवारचा दिवस निराशाजनक!

sakal_logo
By
विराज भागवत

नेमबाजी, बॅडमिंटन आणि जलतरण तिन्हीमध्ये अपयश

Tokyo Paralympics: टोक्यो येथील पॅरालिंपिक स्पर्धेत गेले दोन दिवस पदकांची लयलूट केल्यानंतर बुधवारचा दिवस भारतीयांसाठी अपयशी ठरला. विविध खेळांत सहभागी झालेले सर्वच भारतीय खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे भारताची पदकसंख्या १० वर कायम राहिली. १० मीटर एअर रायफलमध्ये दोन दिवसांपूर्वी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारी अवनी लेखरा मिश्रगटात अंतिम फेरी गाठू शकली नाही. तिसऱ्या फेरीत अवनीला ६२९.७ गुण मिळवता आले. त्यामुळे ती २७वी आली. तिच्यासह सहभागी झालेले इतर पॅरानेमबाज सिद्धार्थ बाबू आणि दीपक कुमार अनुक्रमे ४० आणि ४३वे आले. या स्पर्धेत जर्मनीच्या संघाने सुवर्ण आणि रौप्य तर दक्षिण कोरियाच्या संघाने कांस्यपदक मिळवले.

बॅडमिंटनमध्येही निराशा

Palak-Kohli-India

Palak-Kohli-India

यंदाच्या पॅरालिंपिक स्पर्धेत प्रथम बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला. मिश्र विभागात भारताकडून प्रमोद भागवत आणि पालक कोहली सहभागी झाले होते. सलामीलाच त्यांचा दुसऱ्या मानांकित लुकास माझुर आणि फीस्टॉन नोपल यांच्याविरुद्ध सामना होता. कडव्या लढतीनंतर भारतीय जोडीला ९-२१, २१-१५, १२-२१ अशी हार स्वीकारावी लागली. हा सामना ४३ मिनिटे चालला. पहिल्या गेममध्ये भारतीय जोडी ५-११ अशी पाठीमागे पडली होती. हा गेम सहज गमावल्यानंतर मात्र दुसऱ्या गेममध्ये १३-११ अशी आघाडी घेत बाजी मारली आणि सामन्यात रंग भरले. अंतिम गेममध्येही भारतीय जोडीने कमालीचा संघर्ष केला. १५-१४ अशी आपाडीही घेतली होती, परंतु अंतिम क्षणी ते मागे पडले आणि दोन गुणांनीच हा गेम आणि सामनाही गमावला.

सुयश जाधव अपात्र

जलतरणात महाराष्ट्राचे विशेष लक्ष असलेला सुयश जाधव १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये अपात्र ठरला. २०१८ च्या आशिवाई पैरा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुयशने शर्यत सुरू केली होती. परंतु ५० मीटरनंतर परतताना एकदाच बटरफ्लाय किक मारायची असते, परंतु सुयशने दोनदा किक मारल्याचे दिसून आले. त्यामुळे तो अपात्र ठरला. सुयशसाठी ही स्पर्धा अजूनपर्यंत निराशाजनक ठरली आहे. २०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये तो सहभागी होणार होता, परंतु सर्दी आणि गळा दुखत असल्यामुळे तो खेळू शकला नाही. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. आता तो शुक्रवारी ५० मीटर बटरफ्लायमध्ये सहभागी होणार आहे.

loading image
go to top