King Of Fifties: भारताच्या 'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम

Rahul Dravid,  Sachin Tendulkar, Sourav Ganguly and Virat Kohli
Rahul Dravid, Sachin Tendulkar, Sourav Ganguly and Virat Kohli

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटने अनेक महान फलंदाज दिले आहेत. क्रिकेटचा इतिहास पाहिला जागतिक क्रिकेटला भारताने एकपेक्षा एक सरस फलंदाज दिले आहे. शतकांचं शतक करणारा फलंदाज भारताचा आहे. मात्र सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही भारतीय खेळाडूच्याच नावावर आहे. (King Of Fifties news in Marathi)

Rahul Dravid,  Sachin Tendulkar, Sourav Ganguly and Virat Kohli
IND vs NED : आफ्रिकेचा क्षणिक आनंद! 3 तासातच भारत अव्वल स्थानावर विराजमान

सुनील गावस्कर यांच्यापासून विराट कोहलीपर्यंत अनेक फलंदाज झाले आहेत, ज्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम केले आहेत. मात्र सचिन तेंडुलकरने फलंदाजीचे जवळपास सर्वच विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सर्वाधिक अर्धशतके ठोकणारे भारताचे टॉप ४ फलंदाज

सौरव गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. सौरव गांगुलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ४८८ डाव खेळले. या काळात एकूण १०७ अर्धशतके ठोकली. तो भारताकडून टी-२० क्रिकेट खेळला नाही.

Rahul Dravid,  Sachin Tendulkar, Sourav Ganguly and Virat Kohli
VIDEO : माझ्याशी लग्न करशील! मॅच सुरु असताना दुसरीकडे रंगला प्रपोझचा खेळ

विराट कोहली

माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली सध्या अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर करत आहे. सचिन तेंडुलकरने केलेले सर्व विक्रम कोहली एकामागोमाग एक मोडत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 126 आंतरराष्ट्रीय अर्धशतकं केली आहेत.

राहुल द्रविड

सर्वाधिक अर्धशतकं ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ६०५ डावांत एकूण १४६ अर्धशतके झळकावली आहे.

Rahul Dravid,  Sachin Tendulkar, Sourav Ganguly and Virat Kohli
BCCI: जय शाह यांची ऐतिहासिक घोषणा, आता महिलांना देखील मिळणार समान मानधन

सचिन तेंडुलकर

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीतील 782 डावांत एकूण 164 अर्धशतके ठोकली, तर 100 शतकांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर हा संपूर्ण जगात सर्वाधिक शतकं आणि अर्धशतकं करणारा फलंदाज आहे. याशिवाय सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com