
लंडन : विम्बल्डन ग्रँडस्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेतील मानांकित खेळाडूंची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. तिसरी मानांकित जेसिका पेगुला हिचा पहिल्याच दिवशी पराभव झाल्यानंतर फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम विजेती कोको गॉफ हिचा महिला एकेरीत, तर तिसरा मानांकित ॲलेक्झँडर झ्वेरेव याचा पुरुष एकेरीत पराभव झाला.