आता त्यांना सोडणार नाही; ललित मोदींकडून BCCI ला धमकी वजा इशारा

Lalit Modi
Lalit ModiSakal

आयपीएल (IPL) प्रेक्षपणाच्या अधिकारासंदर्भातील जुन्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांना दिलासा देणारा हा निर्णय बीसीसीआयला मोठा धक्का देणारा आहे. सेवा शुल्क प्रकरणात बीसीसीआयने (BCCI) ललित मोदींवर दोषीचा ठपका ठेवत त्यांच्यावर आजीवन बंदीची कारवाई केली होती. मात्र ललित मोदींनी स्वत:ला निर्दोष सिद्ध केले आहे. ललित मोदी हे आयपीएल (IPL) चे संस्थापक आणि भारतीय टी-20 लीगचे पहिले अध्यक्ष होते. 2008 ते 2010 पर्यंत त्यांनी आयपीएलचा कारभार पाहिला आहे.

Lalit Modi
CWC 2022 : पाक जिंकले; भारताचा सेमीसाठी पेपर झाला सोपा

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीपी कोलाबावाला यांनी आपला निर्णयात म्हटलंय की, वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप इंडिया (WSGI), ने 2008-17 च्या कालावधीत आयपीएल (IPL) चे अधिकार होते. त्यांनी BCCI ला 1791 कोटी रुपये उत्पन्न मिळवून देण्यास हातभार लावला. 425 कोटी रुपयांच्या सेवा शुल्कासंदर्भात BCCI-WSGI-MSM यांच्यात करार झाल्याचा उल्लेख कोर्टाने केला. केवळ ललित मोदींना कल्पना होती, असा दावा बीसीसीआयने केला होता. न्यायालयाने याची सर्वांना माहिती होती, असे सांगितल्यामुळे ललित मोदी निर्दोष असल्याचे समोर आले आहे. आपल्या बाजूनं निकाल लागल्यानंतर ललित मोदींनी बीसीसीआयला धमकी वजा इशारा दिला आहे.

Lalit Modi
तिने इतिहास पुन्हा लिहायला लावला! Shabaash Mithu चा टिझर रिलीज

क्रिकबझच्या वृत्तानुसार, ललित मोदी म्हणाले की, सत्याचा विजय झाला. मी एकट्याने आयपीएलची सुरुवात केलेली नाही. पण BCCI ने माझ्यावर आजीवन बंदी घातली. आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वोत्तम स्पर्धा आहे. देशातील लोकांना टीव्हीवर मोफत सामने पाहता यावेत यासाठी काम केले. मी निर्माण केलेल्या स्पर्धेच्या जोरावर जगणाऱ्या लोकांनी माझ्यावरच बंदी घातली. ते लोक एवढे घाबरले की माझ्यासह मुलांना तिकीट देण्यावर बंधन घालत आयपीएल बघण्यापासून रोखले. आता ब्रिटनमध्ये बीसीसीआयच्या विरोधात गुन्हा दाखल करेन, त्यांची मजा बघा, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com