तिने इतिहास पुन्हा लिहायला लावला! Shabaash Mithu चा टिझर रिलीज | Shabaash Mithu a Biopic of Mithali Raj teaser release | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shabaash Mithu a Biopic of Mithali Raj teaser release

तिने इतिहास पुन्हा लिहायला लावला! Shabaash Mithu चा टिझर रिलीज

भारताची दिग्गज फलंदाज आणि कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिचा बायोपिक Shabaash Mithu चे टिझर नुकतेच रिलीज झाले आहे. या टीझरचा व्हिडिओ मिताली राजने आपल्या ट्विटर अकाऊंवर देखील शेअर केला आहे. या व्हिडिओला मिताली राजने 'पुरूषांचे वर्चस्व असलेल्या खेळात तिने इतिहास घडवण्याऐवजी इतिहास पुन्हा लिहायला लावला..... आता खेळ बदलणार' असे कॅप्शनही दिले.

हेही वाचा: IPL 2022: दिल्लीला कंजूसपणा भोवणार? चोप्राची 'आकाश'वाणी

मिताली राजच्या बायोपिकमध्ये मिताली राजची भुमिका प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने साकारली आहे. यासाठी तिने क्रिकेटचे धडेही गिरवले होते. मिताली राज सध्या न्यूझीलंडमध्ये आपला अखेरचा वर्ल्डकप खेळत आहे. दोन दशकाहून अधिक काळ भारतीय महिला क्रिकेटसाठी देणाऱ्या मिताली राजला पहिला वहिला महिला वर्ल्डकप जिंकून निरोप देण्यासाठी भारतीय संघांने कंबर कसली आहे. भारत सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: श्रेयसची चॉईसच निराळी; विराट-रोहित नाही तर 'हा' अपयशी कर्णधार आवडीचा

मितालीच्या नेतृत्वातील संघाचे दोन सामने शिल्लक असून त्याच्या निकालावरच भारताचे सेमी फायलमधील तिकिट फिक्स होणार आहे. दरम्यान, मिताली राजने सर्वाधिक वर्ल्डकप खेळण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच तिने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे सामन्यात 68 धावांची अर्धशतकी खेळी करून वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याच्या विश्वविक्रमाशी देखील बरोबरी केली. मितालीने वर्ल्डकपमध्ये 12 अर्धशतके ठोकली आहेत.

Web Title: Shabaash Mithu A Biopic Of Mithali Raj Teaser Release

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..