U-19 World Cup : सौम्य पांडेचा भेदक मारा; पहिल्या सामन्यात भारतानं बांगलादेशला लोळवलं

U-19 World Cup
U-19 World Cup ESAKAL

U-19 World Cup IND vs BAN : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत गतविजेत्या भारताने विजयी सुरूवात केली. आपल्या पहिल्याच सामन्यात भारताने बांगलादेशचे आव्हान परतवून लावले. प्रथम फलंदाजी करत 251 धावा करणाऱ्या भारताने बांगलादेशला 167 धावात रोखलं. भारताने पहिला सामना 84 धावांची दणदणीत विजय मिळवला.

U-19 World Cup
U-19 World Cup IND vs BAN: भारत - बांगलादेशचे कर्णधार भिडले; पंचांनी मध्यस्थी केली म्हणून...

तत्पूर्वी, उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला बांगालदेशने प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. मात्र भारताने अर्शीन कुलकर्णीला (७) लवकर गमावले. मुशीर खान (३) देखील फार काळ टिकला नाही. मात्र त्यानंतर सलामीवीर आदर्श सिंह आणि उदय सहारन यांनी डाव सावला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी रचली. 32 व्या षटकात आदर्श 76 धावा करून बाद झाला.

कर्णधार सहारन यांच्यासोबत प्रियांशू मोलिया सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र बांगलादेशने चांगली गोलंदाजी केली आणि धावगती कमी झाली. सहारन 94 चेंडूत 64 धावा करून बाद झाला.

U-19 World Cup
Shoaib Malik : निकाह 'जाहीर' केल्यानंतर अवघ्या काही तासात मलिकने टी 20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला

त्यानंतर अयारवेली अवनीशने 23 धावा केल्या. मोलियाची 42 चेंडूत 23 धावांची खेळी 47 व्या षटकात संपुष्टात आली. सचिन धसने नाबाद 26 धावांची चांगली खेळी करत संघाला 251/7 पर्यंत मजल मारून दिली. बांगलादेशसाठी मारुफ मृधाने चांगली गोलंदाजी केली. त्याने आठ षटकांत 43 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com