
Pro Kabaddi League 2025
sakal
पुणे : प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश करण्याचा अखेरचा मान यु मुम्बाने मिळविला. लीगच्या ११व्या पर्वात मंगळवारी झालेल्या सामन्यात यु मुम्बाने बंगाल वॉरियर्सचा ३६-२७ असा पराभव केला. या विजयाने यु मुम्बाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. यु मुम्बा संघाने सातव्या पर्वानंतर प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला.