U19 World Cup: इंग्लंडची 24 वर्षांची प्रतिक्षा संपली

सेमी फायनलमध्ये अफगाण पराभूत, इंग्लंडने गाठली फायनल
U19 World Cup England Reached in Final First Time in 24 years
U19 World Cup England Reached in Final First Time in 24 yearsesakal

U19 World Cup: इंग्लंड आणि अफगाणिस्तान (England U19 vs Afghanistan U19) यांच्यात झालेल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने अफगाणिस्तानचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने (England Cricket Team) तब्बल २४ वर्षांची दीर्घ प्रतिक्षा संपवत १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये (U19 World Cup) पहिल्यांदाच फायनल गाठली. अफगाणिस्तान विरूद्धच्या सेमी फायनमध्ये इंग्लंडचा फिरकीपटू रेहान अहमदने चांगली कामगिरी केली. त्याने ६ षटकात ४१ धावा देत ४ विकेट घेतल्या. (U19 World Cup England Reached in Final First Time in 24 years)

U19 World Cup England Reached in Final First Time in 24 years
IPL 2022: हार्दिक कोणाकडून गिरवले कॅप्टन्सीचे धडे?

१९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये (U19 World Cup) इंग्लंड विरूद्ध अफगाणिस्तान सामन्याला पावसाचे गोलबोट लागले होते. त्यामुळे हा सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ६ बाद २३१ धावा केल्या. इंग्लंडकडून जॉर्ड थॉमसने ५० तर जॉर्ज बेल (५६) आणि अॅलेक्स हॉर्टनने ५३ धावा केल्या. २३१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची (Afghanistan Cricket Team) सुरूवात खराब झाली. मात्र मोहम्मद इशाकने ४३ तर आणि अल्लाह नूरने ६० धांवांची खेळी करत डाव सावरला. मात्र या नंतर आलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांना खेळपट्टीवर थांबता आले नाही.

U19 World Cup England Reached in Final First Time in 24 years
IPL 2022: हार्दिक गोलंदाजीबद्दल म्हणतो, ते सरप्राईज असेल!

अफगाणिस्तानला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूत १९ धावांची गरज होती. अफगाणिस्तानकडे अजून ४ फलंदाज शिल्लक होते. मात्र रेहान अहमदने ४६ व्या षटकात फक्त १ धाव देत ३ विकेट घेतल्या. अखेर अफगाणिस्तानला २१५ धावांपर्यंतच मजल मारता आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com